मधुकरराव पिचड यांच्या निधनाने दलितआदिवासींना जोडणारा दुवा हरपला – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.7 – माजीमंत्री आणि ज्येष्ठ आदिवासी नेते मधुकराव पिचड यांच्या निधनाने दलित आदिवासींना जोडणारा दुवा हरपला आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवगंत मधुकराव पिचड यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.
दिवगंत मधुकराव पिचड आणि केद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रीमंडळात एकत्र मंत्री म्हणुन काम केलेले आहे.अनेक वर्ष मधुकराव पिचड यांच्याशी आपले जवळचे संबंध होते.मधुकराव पिचड हे अत्यंत
मनमिळावू आणि ज्येष्ठ अनुभवी नेते होते.त्यांना दलित आदिवासी बहुजनांच्या कल्याणाचा ध्यास होता.ग्रामीण भागातील जिवनाशी ते निगडीत हेते.शेतकरी शेतमजुर आदिवासी अनेक ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्याचा त्यांना प्रगल्भ अनुभव होता.राज्याच्या विकासाची दुरदृष्टी मधूकराव पिचड यांच्याकडे होती.त्यांच्या निधनाने सबंध महाराष्ट्र राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचार धारेवर दिवगंत मधुकराव पिचड यांचा दृढविश्वास होता.
आंबेडकरी जनतेशी त्यांची बांधिलकी होती.दलित पँथरच्या चळवळीला त्यांनी आम्हाला मदत केली होती.आंबेडकरी चळवळीचे ते मित्र होते.राजकारणातील ते आजातशत्रु होते.त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. अशी शोकभावना ना.रामदास आठवले यांनी पाठवलेल्या शोक संदेशात त्यांनी व्यक्त केली आहे.