सामोडे अनुदानित आश्रमशाळेच्या माजी विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी !

पिंपळनेर – अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे रोमहर्षक सुखद प्रसंग अनुभवायला मिळाला.
निगदी ता.धडगांव जिल्हा नंदूरबार येथील एक व्यक्ती प्राचार्य मनेष माळी यांच्या दालनात परवानगी घेऊन आता शिरला आणि ओळखलत का सर ? म्हणून उभा राहिला.प्राचार्य मनेष माळी आश्चर्य आणि प्रश्नार्थक नजरेने बघत असतांनाच सर मी प्रताप जहांगीर पावरा धडगांवचा या शाळेचा माजी विद्यार्थ्यी म्हणून सांगत आपण सध्या एम.बी.बी.एस च्या तिसऱ्या वर्षांत शिकत असल्याचे व या महंन्मांगल्यात गजबजलेल्या तीर्थस्थानासह ज्ञानरुपी मंत्रोच्चार करणाऱ्या गुरुजनांची खूप दिवसांपासून भेट देण्याची लागलेली आस त्याने व्यक्त केली.
प्राचार्य मनेष माळी यांना आपल्या माजी विद्यार्थ्यांची ही उत्तुंग घेतलेली झेप बघून रोमहर्षित अत्यानंद झाला.
हा विषय प्राचार्य मनेष माळी यांनी संस्था अध्यक्ष अँड संभाजी पगारे यांच्या पर्यंतही पोहचवला, अॅड संभाजी पगारे यांनी मी या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यास लगेच शाळेत पोहचतो म्हणून सांगितले.तो पर्यंत या माजी विद्यार्थ्यांने विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना “निट परिक्षेला सामोरे जातांना” या विषयावर मार्गदर्शन केले.
म.फुले विद्या प्रसारक संस्था पिंपळनेर चे अध्यक्ष अँड संभाजी पगारे यांनी संस्थेचे संचालक विजयराव सोनवणे, पत्रकार राजेंद्र गवळी शाळेचे मुख्याध्यापक उमेश माळी, प्राचार्य मनेष माळी यांच्या सह विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थ्यां प्रताप जहांगीर पावरा याचा अभिनंदनपर यथोचित सत्कार केला.
प्रताप जहांगीर पावरा यांनी आपल्या यशोमय प्रयत्नांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला मी देखील अतिदुर्गम भागातील आहे माझे आईवडील निरक्षर व रानावनात काबाडकष्ट करणारे असून मी पाहीलेल्या स्वप्नाला जिद्द , चिकाटी, मेहनतीने आकार देत आहे म्हणून सांगत विद्यार्थ्यांनसमोर आपण रचलेला इतिहास व्यक्त केला.
अँड संभाजी पगारे यांनी अशा उत्तुंग भरारी घेतलेल्या यशोशिखर गाठलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समोर बसलेल्या व विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरेल म्हणून मत व्यक्त केले.
माजी विद्यार्थ्यां प्रताप जहांगीर पावरा चा परिचय प्रा.विजय ठाकरे यांनी करून दिला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय ढोले यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.प्रविण पगारे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक रितेश एखंडे, गणेश नेरकर, शरद सुर्यवंशी, प्रविण सुर्यवंशी,प्रा.राजेंद्र सोनवणे,प्रा.गणेश भावसार, विलास पगारे यांचे सह शिक्षक, चतुर्थ कर्मचारी प्रयत्नशील होते