नगर येथील मंगल भक्त सेवा मंडळाच्या पुढाकाराने भक्ती मैफल संपन्न

नगर-येथील मंगल भक्त सेवा मंडळाच्या पुढाकाराने राजाभाऊ कोठारी यांचा गुरुपौर्णिमा उत्सव दत्त क्षेत्रात उत्साहात व भक्तांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी नादब्रह्म संगीतालयाची देव भक्तीचा भुकेला हा भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.पवन श्रीकांत नाईक यांच्या संगीत वृंदाने संतांचे अभंग,भक्ती गीते व सुफी रचना सादर करून भक्तगणांची ब्रह्मानंदी टाळी लावली.
देव भक्तीचा भुकेला मध्ये पुढील कलाकार वृंदानी रचना सादर केल्या.यामध्ये पवन श्रीकांत नाईक,संवादिनी-कल्याण मुरकुटे व प्राजक्ता उकिर्डे,बेंजो-कुलदीप चव्हाण,सतार-स्मिता राणा,तबला-शेखर दरवडे,सहवादक-मुलांशू परदेशी व राधिका परदेशी,सहगायक-श्रेयस शित्रे,संकेत गांधी,पवन तळेकर,नवरतन वर्मा,लोचन साळुंके व अविष्कार ठाकूर तर निवेदिका दीप्ती शुक्रे होत्या.
यामध्ये सर्व श्लोक(संस्कृत),कबीराचे शेले,माझे माहेर पंढरी,आरंभी वंदिन,अबीर गुलाल,निघालो घेऊन दत्ताची,अमृताहूनी गोड,येथोनी आनंदू,नको देवराया, देहाची तिजोरी,आकाशी झेप घे रे,केशवा माधवा,वेदांनाही नाही कळला,बाबा हमारे भगवान,शंकर बाबा,समय तोरी कुहू न, भोले बाबा के दरबार,किन्ना सोना,आजा तैनू अखियाँ,आली भवानी राऊळात आदी रचना सादर केल्या.
या मैफल प्रसंगी स्वामी विश्वेश्वर महाराजांसह अनेक मान्यवर,भक्तगण,डॉक्टर,उद्योजक,इंजिनिअर आदी उपस्थित होते.त्यांनी गुरुपोर्णिमेनिमित्त राजाभाऊ कोठारी यांचा सन्मान केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमआयडीसीतील मंगल भक्त सेवा मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी व पधाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
