बिताका येथील बितनगडावर आर्मड कोर सेंटर अॅण्ड स्कुल अहमदनगर या विभागाकडून ध्वजारोहन.

अकोले/प्रतिनिधी-
आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत 15 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अकोले तालुक्यातील बिताका येथील बितनगड येथे आर्मड कोर सेंटर अॅण्ड स्कुल अहमदनगर या विभागाकडून गडावर ध्वजारोहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी आर्मड कोर सेंटर अॅण्ड स्कुलचे
नायब रीसालदार करनी राम
दफेदार, वरपे धनंजय ,एलडी भीमसींह,
एलडी तामनर आर. डी.,एलडी संदीप सिंह,एएलडी दीवाकर डी.,
एएलडी वेंकटेश,सवार आरून कुमार,
सवार पाण्डा ई. डी.
यांनी ध्वजारोहन कार्यक्रम केला व याप्रसंगी पंचप्राण प्रतिज्ञा घेण्यात आली. सर्वप्रथम जिल्हा परिपद प्राथमिक शाळा बिताका येथील ध्वजारोहन कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी विधी विभागाचे संचालक व बिताका येथील रहिवासी ऍडव्होकेट राजाराम बेंडकोळी यांनी मनोगत व्यक्त केले व श्रीनिवास अमृतदास यांनी बितनगडा विषयी माहिती दिली.

जायनावाडी बिताका ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बापूसाहेब राजळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून ग्रामस्थांच्या हस्ते आर्मड कोर सेंटर अॅण्ड स्कुल या विभागाकडून आलेल्या मेजर व सैनिक यांचा बितनगडावर यथोचित सत्कार करण्यात आला. ग्रामसेवक बापुसाहेब राजळे यांनी मेरी मिट्टी , मेरा देश या अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले.
याप्रसंगी विधी विभागाचे संचालक ऍडव्होकेट राजाराम बेंडकोळी , सरपंच बाळू डगळे , उपसरपंच संदीप भांगरे , ग्रामसेवक बापूसाहेब राजळे , ग्रामपंचायत सदस्य बाजीराव भांगरे , पोलीस पाटील देवराम पेढेकर , काळू भांगरे , गोरख भांगरे , वन विभागाकडील भगवान भांगरे,भोरु पेढेकर ,सुभाष भांगरे ,सखाराम भांगरे ,इंडियन नेव्ही मधील यशवंत भांगरे , निवृत्ति पेढेकर , सागर डगळे , तुकाराम भांगरे , लालू भांगरे , रामदास भांगरे , बाळू मेंगाळ व जायनावाडी, बिताका येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.