मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजेरी! .

दत्ता ठुबे
पारनेर- साधारण ८ वर्षांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील कोपर्डीतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला , तदनंतर तिच्या दुसऱ्या बहिणीच्या लग्नाला येण्याचे त्यावेळी तिचे वडिल बबनराव सुद्रिक यांना दिलेला शब्द नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निघोज येथे काल दुपारी लग्नाला अनपेक्षित हजेरी लावून पाळल्याचे दाखवून दिले.
पारनेर तालुका व शिरूर तालुक्याच्या हद्दीत असलेल्या टाकळी हाजी येथे या मुलीचे लग्न निघोज येथील वराळ परिवारातील मुलाशी ठरविण्यात आले.या मुलीच्या वडिलांचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साधारण ८ वर्षांपासूनचे असणारे संबंध व मुख्यमंत्री फडणवीस हे पुर्ण फौज फाट्यासह या साध्या पद्धतीने झालेल्या लग्नाला अनपेक्षित उपस्थित राहून दिलेला शब्द पाळायचा असतो हे दाखवून दिले व त्यांनी यावेळी लग्नाचे निमंत्रण दिल्याबद्द्ल व नूतम वधूवरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या लग्न सोहळ्यासाठी माजी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर,माजी मंत्री प्रोफेसर रामजी शिंदे,माजी खा.डॉ.सुजय विखे, माजी आ.पोपटराव गावडे ,भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे,पारनेर तालुका अध्यक्ष राहूल शिंदे,संदीप पाटील जनसेवा फाऊन्डेशनचे अध्यक्ष सचिन वराळ , विलासराव हारदे , माजी नगराध्यक्ष विजय औटी व नगर , पुणे जिल्ह्यातील भाजपाचे नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यभर गाजलेल्या पाथर्डी तालुक्यातील कोपर्डी येथे साधारण ८ वर्षापूर्वी दि .१३ जुलै २०१६ रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता , त्यावेळी हे प्रकरण खूप गाजले. त्यामुळे राज्यभर या प्रकरणाने वातावरण तणावपूर्ण झाले होते.दि . २९ नोव्हेंबर २०१७ रोजी या प्रकरणातील आरोपींना पोलीसांनी अटक केली.सर्व साक्षी पुरावे पाहून न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.हे प्रकरण आता वरच्या न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित आहे
.यातील मुख्य आरोपीने दरम्यानच्या काळात तुरुंगातच आत्महत्या केली. अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते.या प्रकरणातील अत्याचारीत कुटुंब ८ वर्षांपासून न्यायासाठी वण वण फिरत पाठपुरावा करीत होते.या प्रकरणाकडे मुख्यमंत्री फडणवीस व हे कुटुंब एकमेकांच्या संपर्कात होते दरम्यान मध्यंतरच्या काळात वडिल बबनराव सुद्रिक यांनी दुसऱ्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण फडणवीस यांना दिले पण विधानसभा निवडणूकीची धामधूम,तदनंतर सत्तेचा सारीपाठ व त्यातून उपमुख्यमंत्री असलेले फडणवीस मुख्यमंत्री झाले.मुख्यमंत्री पदाचा कारभार सुरू करून स्थिर स्थावर होता.जुना शब्द आठवून लग्न समारंभाला तेही नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज व पुणे जिल्हयातील शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी यांच्या मध्यावर असलेल्या कुंड पर्यटन स्थळावरील मंगल कार्यालयात आपल्या संपूर्ण लव्याजामासह तेही दोन्ही जिल्हयातील भाजपा नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजर झाले. यातच सारे आले .