अहमदनगर

काटाळवेढा येथे राणी ताई लंके यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन !


पारनेर प्रतिनिधी
लोकनेते आमदार निलेश लंके व जिल्हा परिषद सदस्या सौ.राणीताई निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नांतून 2021-2022 जनसुविधेअंतर्गत मंजुर विकासकामांचा शुभारंभ आज जिल्हा परिषद सदस्या सौ राणीताई निलेश लंके यांच्या शुभहस्ते पार पडला एकूण 33 लक्ष रुपये इतका निधी मंजूर असून त्याअंतर्गत खटाटेवस्ती रस्ता काँक्रीटीकरण 10 लक्ष रुपये, गावठाण ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रस्ता काँक्रीटीकरण 10 लक्ष रुपये , स्मशानभूमी परिसर विकास करणे 10 लक्ष रुपये, त्याचबरोबर काटाळवेढा व डोंगरवाडी स्मशानभूमी लाईट व्यवस्था करणे 3 लक्ष रुपये ही विकासकामे समाविष्ट आहेत.अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला खटाटेवस्ती रस्ता मार्गी लागल्यामुळे वस्तीवरील नागरिकांनी आमदार श्री.निलेश लंके जिल्हा परिषद सदस्या सौ राणीताई निलेश लंके यांचे आभार मानले.
येणाऱ्या काळात काटाळवेढा व डोंगरवाडी गावासाठी विकासनिधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्या सौ. राणीताई निलेश लंके यांनी दिली, उदघाटनप्रसंगी मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती. या प्रसंगी सरपंच श्री.पियुष गाजरे ,उपसरपंच गणेश पवार माजी उपसरपंच अजित भाईक, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब गुंड, माजी चेअरमन शिवाजी डोंगरे,माजी चेअरमन बाबाजी डोंगरे,माजी चेअरमन रामदास गुंड, दत्त देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष सुभाष गाजरे सर,माजी सरपंच बारकुशेठ भाईक माजी सरपंच यशवंत भाईक, माजी चेअरमन अर्जुन गाजरे,माजी चेअरमन विनोद श्रावदे,माजी चेअरमन लक्ष्मण भाईक, सामाजिक कार्यकर्ते विलास भाईक, दत्तू गाजरे,निलेश लंके मेंढपाळ संघटनेचे संचालक संभाजी भाईक,प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब गाजरे,इंजिनिअर शरद पवार, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अमोल कांबळे,सामाजिक कार्यकर्ते दत्ता भाईक,वि.विकार्यकारी सोसायटी संचालक संजय सरोदे,माजी चेअरमन माऊली गुंड, नारायण वाघ,बाबाजी गाजरे अनिल भाईक,राजू गाजरे,संतोष भाईक,माऊली भाईक, चंदन पवार,सोमनाथ भाईक, संपत भाईक,बाळासाहेब भाईक, मुकेश सरोदे,बाळासाहेब सरोदे,गणेश वाघ ,महादू भाईक,बाबाजी भाईक,दत्तू पाटील भाईक,यशवंत वाघ,पांडुरंग गुंड, गोविंद गुंड,संजय कडूस्कर,शिवाजी गफले आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button