नँशनल पिपल लीडरशीप अँवॉर्ड पुरस्कारसाठी प्रस्ताव पाठवण्याचा आव्हान

प्रतिनिधी /डॉ. शाम जाधव
सांगली( मेहकर ) आज दिनांक १०/१२/२०२४ रोजी तथागत बहुउद्देशीय संस्था, मेहकर द्वारे आयोजित राजमाता माँ जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कर्तृत्ववान बंधू व भगिनींना, तसेच युवक युवतींनचा नँशनल पिपल लीडरशीप अँवॉर्ड पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार असल्याची घोषणा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांनी केली आहे. आपला प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख. १० जानेवारी २०२५ अशी आहे. नँशनल पिपल लीडरशीप अँवॉर्ड म्हणून पुरस्कार देण्यात येत आहे. ह्या पुरस्काराचा संदर्भ खालील प्रमाणे आसा आहे की, नेतृत्व गुणाबदल देण्यात येणारा पुरस्कार हा पुरस्कार त्या व्यक्तीसाठी आहे. ज्यात प्रामाणिक पणा, सचोटी, आत्मीयता, हे गुण नियमितपणे दिसून येतात शिवाय या व्यक्तीचं संवाद कौशल्य, श्रवण कौशल्य, तसंच तो परस्पर नातेसंबंध किती कौशल्याने हाताळतो लोकांशी कसं वागतो, एक नेता ज्याने त्यांच्या लोकांना एका व्यासपिठावर गोळा केलं आहे, आशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या लोकांना दिला जाणारा हा पूरस्कार आहे.
आशाच महाराष्ट्रातील विवीध क्षेत्रामध्ये चांगले काम करणार्या बंधू व भगिनींना, तसेच युवक युवतींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा राबविण्यात येणार आहे. नँशनल पिपल लीडरशीप अँवॉर्ड या पुरस्काराचे गावपातळीवर मेहकर येथे वितरण होणार आहे. यामध्ये सन्मानपत्र, सन्मानचिन्ह ट्राफी, मेडल, पंचरंगीदुपट्टा, असे या पुरस्काराचे स्वरूप ठेवण्यात आले आहे. यासाठी इच्छुकांनी
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे आशा गुणीजनांना
पुरस्कार वितरण व जेष्ठ नागरिक, माजी सैनिक यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी आपला प्रस्ताव तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांच्या संपर्क कार्यालय मिलिंद नगर वार्ड नं १९ मेहकर ता. मेहकर जिल्हा बुलढाणा येथे यांच्याकडे सादर करावयाचा आहे. किंवा मो. 9970467141, 9881199852 या संपर्क नंबरवर पाठवून संपर्क साधावा. त्या अनुषंगाने सामाजिक ल राजकिय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान सामाजिक व राजकिय क्षेत्रातील बंधू व भगिनींना, तसेच युवक युवतींना आपला कार्य अहवाल सादर करण्याचे आव्हान तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांनी केले आहे