निघोजला शुक्रवार(दि.१३)पासून उपसरपंच चषक भव्य क्रिकेट स्पर्धा

दत्ता ठुबे
पारनेर – निघोज ग्रामपंचायतीचे उपसरपंच ज्ञानेश्वर ऊर्फ माऊलीशेठ वरखडे मित्र परिवार आयोजीत भव्य अंडर आर्म नाईट प्रिमिअर लिग ” उपसरपंच चषक ” क्रिकेट स्पर्धा शुक्रवार दि.१३ ते रविवार दि.१५ या ३ दिवस संपन्न होणार असल्याची माहिती उपसरपंच ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली शेठ वरखडे मित्र परिवाराने दिली आहे.
उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे ५ वे वर्ष असून निघोज येथील वडनेर रोडवरील वरखडे वस्ती मैदानावर या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.प्रथम क्रमांक १५,५५५ रुपये,व्दितीय क्रमांक १३,३३३ रुपये,तृतीय क्रमांक ११,१११ रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत तर मैदान,सन्मान चिन्ह, दादा फायटर्स,बॉल,स्टम्प,बॅट, सरपंच इलेव्हन अळकुटी,शिवबा फायटर्स,सरपंच सचिन वराळ,शिव शंभो वॉरिअर्स,जाहिरात यासाठी विविध दानशूर व्यक्तींनी सौजन्य दिले आहे.
तर शनिवार दि.१५ रोजी ८ वाजता या स्पर्धेचे खास आकर्षण असलेल्या सायली पाटील यांचा जल्लोष म्युझिकल ऑर्केस्ट्रा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.