कळसुबाई गडावर कचऱ्याची होळी!

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
कळसुबाई शिखरावर गडावरील व्यवसायिकांमार्फत स्वछता करण्यात आली महिन्यातून 1 ते 2 वेळेस ही स्वच्छता मोहीम गडावरील व्यवसायिकांमार्फत नेहमी राबविली जात असते.मात्र आज कोणत्याही वृक्षाची होळी न करता पर्यटकांमार्फत फेकण्यात आलेल्या कचऱ्याची होळी गडावरील व्यावसायिकांच्या मार्फत करण्यात आली. प्रशासनाचा कोणताही सहभाग न घेता अनेक वर्षांपासून हे कार्य शिखरावरील व्यावसायिक राबवित आले आहेत.
आपले गड स्वच्छ कसे ठेवावे याचा आदर्श या स्थानिक व्यावसायिकांच्या माध्यमातून आपण घ्यायला हवा.
अनेक गडप्रेमी येथे भेट देत असतात त्यांनीही या व्यावसायिकांचे कौतुक केले आहे.
स्थानिक ग्रामपंचायत जहागिरदारवाडी (बारी) यांनीही यांचे या नेहमीच राबविणाऱ्या कामाबद्दल कौतुक करत केले .
व्यवसायिकांमध्ये गोरख घोडे, मचिंद्र घोडे, राजू करटूले, भरत घोडे, दिनेश खाडे, पांडुरंग घोडे,शांताराम घोडे आदींचा समावेश होता
