कोकणवाडी ता अकोले येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता

अकोले प्रतिनिधी
अखिल मानवता व सामाजिक सहिष्णुता व विश्वात्मक भावनांचा प्रसार होऊन प्रत्येकास अंतरिक समाधान मिळावे म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मौजे कोकणवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह पारंपारिक पद्धतीने आयोजित करण्यात आला होता.

ह. भ. प. अविनाश महाराज शिंदे यांनी काल्याच्या कीर्तनातून श्रीकृष्णांच्या लीलेबरोबर समाज प्रबोधनही केले. त्यावेळी ते म्हणाले,” तरुणांनी व्यसनाच्या नादी लागू नये, समाजात आई-वडिलांबरोबर आपल्या गावाचे नाव कमवावे, कष्टाने जीवन समृद्ध करावे “असे आवर्जून सांगितले. दुपारी चार वाजता दिंडी निघाली. सर्व भाविक व गावकरी महिला पुरुष दिंडीत सहभागी झाले.”ज्ञानबा तुकाराम”च्या गजरात दिंडी तलावाकडे पोहचली. मूर्तीची पूजा आरती करून पालखी मंदिराकडे आणली. महाप्रसादानंतर सप्ताहासाठी विशेष कामगिरी करणाऱ्या ह. भ. प. अविनाश महाराज शिंदे, गायनाचार्य तानाजी गोडे, निवृत्ती गोडे, मीराताई भांगरे, लहानु भांगरे, मृदुंगाचार्य हेमंत घारे, महेंद्र घारे, हरिपाठ काकडा भजन करणारे भीमा हरी इदे, पंढरी चौरे, साऊंड सिस्टिम देणारे देवराम भांगरे यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी महादू बेंडकोळी, विष्णू पांडू जाधव, देवराम पुंजा जाधव, निवृत्ती दगडू जाधव, महेंद्र जाधव, पोपट बेंडकोळी, रामू जाधव, गुलाब गोडे, संतु दत्तू जाधव, काळू सोमा जाधव, म्हसू रामा जाधव, गोरख निवृत्ती जाधव, सरपंच सुलोचना संतू जाधव, उपसरपंच जगन लहरे, कामगार कमिटीचे भगवान भागा जाधव, भाऊ निवृत्ती बेंडकोळी, संतु किसन जाधव, भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ व समस्त गावकरी उपस्थित होते.