गुरुवर्य रा.वी. पाटणकर सर्वोदय विद्यालयात आनंद मेळावा संपन्न

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा.वी. पाटणकर सर्वोदय विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला
या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य श्री बादशहा ताजने सर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी विविध प्रकारचे स्टॉल या आनंद मेळाव्यात लावण्यात आले होते परिसरातील सर्व पालक व्यापारी वर्गाने या मुलांच्या आनंदामध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला या कार्यक्रमांमध्ये विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक किशोर देशमुख सर श्री पगारे सर,व पांडे सर, श्री दिंडे सर यांनी मुलांना आपल्या आवाजाची चमक दाखवत मुलांचे मनोरंजन केले
या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळण्यासाठी मदत झाली . अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहार कसे करावे नफा तोटा याची माहिती मिळण्यास मदत झाली. या विद्यालयात नेहमीच विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळण्यास मदत होते. याप्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री गिरी सर हे उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री हेकरे सर यांनी केले .