इतर

बिबट्या प्रकरणात मच्छिंद्र मंडलिक यांची न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता 

         अकोले /प्रतिनिधि

अकोले शहरालगत माळीझाप येथील भाऊसाहेब आल्हाट यांच्या घरात बिबट्या  घरात घुसल्याने मच्छिंद्र मंडलिक व ग्रामस्थांनी सावधगिरीने आल्हाट  कुटुंबियांना बाहेर काढले व बिबट्या ला घरात कोंडून बाहेरून घराला कुलूप लावले. घरात वाघ कोंडल्याची मोठी चर्चा परिसरासह अकोले शहरात पसरली यामुळे मोठी गर्दी झाली. वाघ पाहण्यासाठी अनेक जन घराच्या अवतीभवती येत होते. मच्छिंद्र मंडलिक यांनी तात्काळ वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना फोन केला व वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याला  पकडण्यासाठी पिंजरा घेऊन आले.

        तसेच वन अधिकारी वाघ पकडण्यासाठी अत्यंत कौशल्य पणाला लावून होते मात्र लोकांची वाघ पाहण्याची गर्दी यामुळे तेथे अकोले पोलिसांचे पथकही हजर झाले.

 यावेळी पोलीस निरीक्षक . रविंद्र तायडे यांनी दमबाजी करत जमाव पांगवण्यासाठी काठीने मारण्याचा धडाका लावला. तरुण ,वयस्कर ज्येष्ठांना मारहाण केली. ग्रामस्थांनी व ग्राहक पंचायतीचे मच्छिंद्र मंडलिक यांनी सर्व खबरदारी घेत आल्हाट कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढले. आपली प्रामाणिक भुमिका पार पाडली. मात्र पोलिस निरिक्षक तायडे यांनी  सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र मंडलिक यांनाच दमदाटी करून  सरकारी कामात अडथळा आणला असा खोटा गुन्हा दाखल केला 

        यावेळी रविंद्र  तायडे यांनी मच्छिंद्र मंडलिक यांनाच दमबाजी करून ३५३ व १८६ गुन्हा दाखल केला. यात त्यांना त्यावेळी शिक्षा म्हणून दंड भरावा लागला. ही शिक्षा मच्छिंद्र मंडलिक यांना झाल्याचे समजताच अकोले – संगमनेर तर जिल्हाचे विधितज्ञ ॲड अनिलराव आरोटे यांनी स्वतः लक्ष देऊन केस चालवली ही केस १० वर्ष 2महिने १२ दिवस चालली.

        जिल्हा न्यायाधीश -१ व अतीरिक्त सत्र न्यायाधीश संगमनेर श्री दिलीप  शिवाजीराव घुमरे साहेब यांच्या पुढे खटल्याचे कामकाज चालले सरकार तर्फे साक्षीदाराच्या साक्षा त्या मध्ये सरकारच्या आरोपी विरुद्ध गुन्हा सिध्द झाला नाही हे मेहेरबान कोर्टाने गुन्हा सिध्द न झाल्याचा व खोटा गुन्हा दाखल केल्याचा निकर्ष नोंदून मच्छिंद्र मंडलिक यांची  निर्दोष मुक्तता केली.मच्छिंद्र मंडलिक तर्फे अकोले – संगमनेर व जिल्हाचे विधीतज्ञ ॲड अनिलराव आरोटे त्यांचे सहकारी ॲड धनंजय भोंगळे यांनी काम पाहिले.

————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button