
. सोनई /प्रतिनिधी.
लष्करात २१ वर्षे सेवा करुन सोनईचे सुपुत्र अनिल घोरपडे दि ३ रोजी सेवानिवृत्त झाले त्याबद्दल सोनई येथील सुनील भाऊ गडाख युवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला
अनिल काशिनाथ घोरपडे यांची गावातुन भव्य मिरवणुक काढण्यात आली ही मिरवणुकीस शनिशिंगणापूर चौकातुन सुरुवात झाली एस टी स्टँड मार्ग हाँटेल जनपथ येथे आली या मिरवणुकीत अशोक मरकड; संदिप पिराजी कुसळकर;सुधीर वैरागर;श्रीराम दळवी; संदिप घोडेचोर;गणेश आंधळे यांच्या सह अनेक युवक सहभागी झाले होते
सोनई ग्रामस्थ व सुनिल भाऊ गडाख युवा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती सुनिल भाऊ गडाख यांच्या हस्ते अनिल घोरपडे यांचा श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला
यावेळी सोनई ग्रामस्थ व घोरपडे यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते या सत्कार सोहळ्यासाठी त्रिदल माजी सैनिक संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोकराव चौधरी मेजर मेजर बद्रीनाथ ईसरवाडे, मेजर आदीनाथ नजन वडाळा ,मेजर अरुण ईखे घोडेगाव, मेजर नवनाथ महाडिक सोनई, मेजर भुसारी, मेजर शरद दरदले, मेजर आदिक, मेजर राजळे, मेजर फाटके, सोनसळै ,पाडळे तसेच पत्रकार मोहन शेगर, गणेश बेल्हेकर ,अशोक भुसारी, संजय वाघ ,सुनिल भाऊ गडाख युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनईचे माजी उपसरपंच व युवा नेते संदिप दादा कुसळकर ,प्रतिष्ठानचे सचिव अनिल निमसे व गणेश ओव्हाळ व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता
——-