शारीरिक व्यक्तिमत्व विकासासाठी खेळ महत्त्वाचे.- प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे .

अकोले- प्रतिनिधी
शैक्षणिक संकुल मवेशी ता.अकोले येथे रविवार दि.15/12/2024 रोजी सायंकाळी 4 वाजता प्रकल्पस्तरीय क्रीडास्पर्धा व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाला सुरुवात झाली असून स्पर्धा उदघाटन प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रकल्प अधिकारी प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी वरील उदगार काढले.
स्पर्धा उदघाटन कार्यक्रमाला सौ. पुष्पा लहामटे,मवेशीचे सरपंच श्री.यमाजी भांगरे, अनिल भांगरे,रामदास भांगरे,संपत पोरे,परशुराम जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर राजुर प्रकल्पस्तरीय क्रीडासमितीच्या अध्यक्ष तथा राजुर प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी श्रीम.देवकन्या बोकडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

येथे संपन्न होणाऱ्या क्रीडास्पर्धेत कबड्डी,खो-खो,हाॅलीबाॅल,हॅन्डबाॅल,तसेच वैयक्तीक क्रीडाप्रकारात लांबउडी, उंचउडी, धावणे,गोळाफेक,भालाफेक, थाळीफेक या क्रीडाप्रकारात वय वर्ष 14,17 व 19 वर्ष वयोगटात सदर स्पर्धा होत असुन सदर प्रकल्प स्तरीय क्रीडास्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडासमिती, स्वागतसमिती, आरोग्यसमितीसह एकुण 15 विविध प्रकाराच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या क्रीडास्पर्धेबरोबरच आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे व गुणवत्तापूर्ण शिक्षण विकासासाठी आश्रमशाळा प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा प्रदर्शनात चौर्याहत्तर शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला असून उदघाटनपर कार्यक्रमास सहा.प्रकल्प अधिकारी श्री. मनोजकुमार पैठणकर, दिपक कालेकर ,सुनील मोरे,
संजय सोनवणे,आंबादास बागुल, श्री.धादवड,श्री.जगताप,मेजर बांबळे,आदिनाथ सुतार, पंडीत कदम,ज्योती निरभवणे,भाऊसाहेब खरसे,यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
प्रमुख आतिथींच्या हस्ते ध्वजारोहण करून क्रीडा ज्योत पेटवुन क्रीडा महोत्सवाचो उदघाटन केले. या वेळी भरती पुर्व प्रशिक्षण केंद्रांच्या विद्यार्थ्यांसह आश्रम शाळा
विद्यार्थी खेळाडुंनी आकर्षक संचलन करून प्रमुख आतिथींना मानवंदना दिली.

कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात श्रीम.देवकन्या बोकडे आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की,
आश्रम शाळा खेळाडुंना जीवनातील खेळाचे महत्व अनन्यसाधारण असुन
प्रत्येकाच्या शारीरिक व्यक्तिमत्व विकासासाठी खेळ महत्त्वाचे आहेत. मुलांच्या शक्तीला खेळाची जोड दिल्यास आश्रमशाळेतुन नामवंत खेळाडू निर्माण होऊ शकतात.त्यामुळे फक्त क्रीडास्पर्धेपुरते खेळाकडे न पहाता वर्षभर खेळाचा सराव कायम ठेवून प्रत्येक आश्रमशाळेतुन दर्जेदार खेळाडू निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा असे आवाहन श्रीम. बोकडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. तर श्रीम. पुष्पा लहामटे यांनी आमदार किरण लहामटे यांच्यावतीनी सहभागी खेळाडुंना शुभेच्छा दिल्या
प्रकल्पस्तरीय क्रीडास्पर्धा
दि.16 ते 18 डिसेंबर अखेर येथे संपन्न होत असून या क्रीडास्पर्धेत राजुर प्रकल्पातील 38 शासकीय व निमशासकीय शाळेतील 1040 विद्यार्थी आपले क्रीडानैपुण्य दाखवत आहेत.उदघाटनपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पंडीत कदम यांनी केले तर आभार श्री.मुकुंद सुर्यवंशी यांनी मानले.
या प्रकल्प स्तरीय क्रीडास्पर्धेतुन विभागीय स्तरावर विद्यार्थ्यांची निवड होणार असुन क्रीडास्पर्धा पहाण्यासाठी पंचक्रोशीतील पालकही मोठ्या संखेने उपस्थित रहात असुन खेळाचा आनंद घेत आहेत .
