इतर

त्यागमूर्ती स्व.सौ. राजश्री सुभाष गोयल!

भंडारदरा / प्रतिनिधी


अकोले तालुक्यातील घाटघर म्हणजे शेवटचे टोक समजले जाते . याच घाटघरला डाॅ.कल्याण गोयल हे तीन वर्षापुर्वी वैद्यकीय पथकात हजर झाले आणि घाटघरचा कायापालट झाला . त्यातच कोरोना या विषाणुजन्य रोगाने संपुर्ण जगाला विळखा घातलेला असताना भंडारद-याचा आदिवासी भागही या रोगाच्या विळख्यातुन सुटला नाही .

त्याच कालावधीत घाटघरमध्ये तापाची साथ आली . जर या तापाने फणफणलेल्या लोकांची कोरोना टेस्ट केली तर हे शंभर टक्के कोरोनाग्रस्त निघतील याची डाॅक्टरांना जाण होती . आणि यातील बरेच लोक फक्त कोरोना या आजारानेच दगावतील याची डाॅक्टरांना भिती होती . त्यासाठी या लोकांना त्यांनी व गावचे ग्रामविकास अधिकारी गभाले यांनी बाहेरगावी कुठेही न हलवता गावातच उपचार करत कोरोना या नागरीकापासुन पळवुन लावला . गावाचे शंभर टक्के लसीकरणही अहमदनगर जिल्ह्यात सर्वात अगोदर या आदिवासी गावात झाले , तेही डाॅ.कल्याण गोयल यांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळेच. हे डाॅक्टर या गावासाठी एक देवदुत बनले होते .
याच डाॅक्टरांच्या नशिबात एक दुर्देवि घटना घडली . गावापासुन २१० कि.मी वर वैद्यकीय पथकात काम करत असताना मात्र डाॅक्टरांच्या आई
.सौ. राजश्री सुभाष गोयल! यांचे अपघाती निधन झाले . यावेळी डाॅक्टर घाटघर येथे आपली रुग्णसेवा करण्यात मग्न होते . रुग्ण सेवाच हीच ईश्वर सेवा असा मोलाचा सल्ला त्यांच्या आईने डाॅक्टरांना दिला होता . आई चे अपघाती निधन होऊन सुद्धा घाटघर येथे नेटवर्कचा अभाव असल्याने डाॅक्टरांना वेळेवर निरोप पोहचु शकला नाही . त्याच रात्री डाॅक्टरांनी रात्री दोन वाजता एका रुग्णावर उपचार करत त्याला मृत्युशय्येतुन बाहेर काढले होते . घरामध्ये तीन डाॅक्टर असताना सुद्धा नियतीपुढे डाॅक्टरांना झुकावे लागल्याने डाॅक्टरांना त्यांच्या आईवर उपचार करणे शक्य झाले नाही . डाॅक्टरच्या आईच्या निधनाबद्दल सर्व घाटघर गावाने हळहळ व्यक्त केली .घाटघर गावासाठी देवदुत ठरलेल्या डाॅक्टरांच्या मातोश्रींना घाटघर गावाकडुन भावपुर्ण श्रद्धांजली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button