कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा 36 वा वर्धापन दिन साजरा !

राजूर /प्रतिनिधी
कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा 36 वा वर्धापन दिन शेंडी येथे उत्सवात साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम सेवानिवृत्त वनसंरक्षक अंजनकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुधाकर कुराडे मानद वन्यजीव रक्षक अहमदनगर हे होते कार्यक्रमास अभयारण्य क्षेत्रातील समिती अध्यक्ष सरपंच सदस्य व ग्रामस्थ तसेच शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते

कार्यक्रमात वन संरक्षणात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अध्यक्ष समिती सदस्य व सदस्यांना तसेच वनविभाग वनविभागातील कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले तसेच घाटघर येथील निसर्ग कवी खडके व पांजरी येथील मीनानाथ उघडे व लव्हाळ वाडी येथील रावजी मधे व पोकळे यांनी आदिवासी लोक संस्कृती ची जोपासना करून निसर्गाच्या संवर्धनात व संरक्षणात मोलाची कामगिरी केल्याने त्यांना प्रमाणपत्र व पाच हजार रुपये धनादेश देण्यात आले तसेच आदिवासी लोक संस्कृती वाढीसाठी योग्य ते मदत करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले माननीय सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी अभयारण्यातील सर्वांचे आभार मानून वनसंरक्षण व आदिवासी लोकसंस्कृती यांची आमचे जोपासना व संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले सदर कार्यक्रमास डी डी पडवळे वन परिक्षेत्राधिकारी राजूर अमोल आडे वन परिक्षेत्राधिकारी भंडारदरा, रोंगटे सर मुख्याध्यापक शेंडी, पाटील टायगर सेल सदस्य वनपाल सोनार धिदळे मुठे लांडे चव्हाण वनरक्षक गीते तळपाडे पाटील व रतनवाडी कॉल टेंभे पांजरे उडदावणे येथील सरपंच उपस्थित होते
