अहमदनगर

अहमदनगर-लालटाकी येथील सिद्धार्थनगरमध्ये शिवसेना शाखेचा व कार्यालयाचा उदघाट्न सोहळा संपन्न


अहमदनगर-लालटाकी येथील सिद्धार्थनगरमध्ये शिवसेना शाखेचा व कार्यालयाचा उदघाट्न सोहळा संपन्न झाला.यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे,बाबुशेठ टायरवाले, शहरप्रमुख दिलीप सातपुते,उपजिल्हाप्रमुख आनंदारावजी शेळके पाटील,शिवसेना संपर्कप्रमुख सचिन जाधव,आकाश कातोरे,काका शेळके या मान्यवरांसह दलित आघाडी जिल्हा प्रमुख पोपटराव पाथरे,मयुर गायकवाड,युवासेना उपशहर प्रमुख,शाखा प्रमुख पाडुरंग घोरपडे,मोहनराव बुलाखे उपशाखाप्रमुख,शुभम कुलकर्णी,सेक्रेटरी किशोर पटेकर,सहसेक्रेटरी तसेच कार्यकर्ते विनोद पटेकर,सय्यद अस्लम,राहुल गायकवाड,हर्षद कुलकर्णी, डॉनी गायकवाड,बॉबी गायकवाड,संतोष घोरपडे,आरिफ शेख, किरण वाघ,सनी घोरपडे,तेजस गायकवाड, महिला आघाडीच्या फातीमा सय्यद,अरुणा पटेकर,सुनिता घोरपडे,मिना कांबळे,सुनिता बडूणे,उज्वला सितापुरे,विमल गायकवाड, छाया घोरपडे,संगिताताई घोरपडे, वृषाली पटेकर आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
सातपुते म्हणाले पक्ष वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे,नगरमध्ये पूर्ण भगवे वादळ तयार करणार असून विविध ठिकाणी नवीन शाखा सुरु होत आहेत.शिंदे सरकारने केलेली लोकोपयोगी कामे या कार्यालयामार्फत लोकांपर्यंत पोहचवली जावी,त्यांच्या अडचणीचे निराकरण करावे, अनेक जनतेच्या हिताचे निर्णय शिंदे सरकारने घेतले असून ते जनतेपर्यंत पोहचले पाहिजे असेही ते म्हणाले.
शिंदे यांनी शाखेचे उदघाटन झाल्याचे जाहीर करून शिवसैनिकांनी ज्या ज्या जनहित योजना आहेत त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे नागरिक ज्या कामाची मागणी करतात त्याचा पाठपुरावा करून त्या १०० टक्के पूर्ण करण्यात येतील.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीे.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button