इतर

स्वयंघोषित पुढाऱ्यांच्या गरांडयामुळे पारनेरच्या नवनिर्वाचित आमदारांचे स्वातंत्र्य हिरावले – अविनाश पवार

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी
पारनेर विधानसभा निवडणुकीत नवनिर्वाचित आमदारांना जनतेनं जनतेच्या सेवेसाठी मोठ्या विश्वासाने पारनेर- नगर तालुक्यातील भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी व प्रशासकीय पातळीवरील अनुभव पाहुन पारनेर च्या भविष्यासाठी जुना अनुभव पाहुन जनतेनं मतदानरुपी आशिर्वाद देऊन न्यायाची भूमिका पार पाडली

मिळालेल्या संधीचे सोने करणं ही नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे पारनेर तालुका विकासासह काही महत्त्वपुर्ण बाबतीत मागे पडला असुन त्याची भर भरून काढण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर येऊन ठेपली आहे

त्यामुळे त्यांना स्वतंत्र काम करु‌ देत त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आनु नये स्वयंघोषित पुढाऱ्यांचा राजकारणातील अतिरेकपणा घातक ठरू शकतो याचा विचार आमदारांनी करणे आवश्यक आहे नाहीतर मागचे दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही

त्यामुळे आमदारांच्या पदाचा व ज्येष्ठत्वांचा सन्मान राखण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी जवळ आलेल्या स्वंयम घोषित पुढा-यानी गरांडा करताना स्वतःच आत्मपरीक्षण करुन स्वतःची उंची तपासणे गरजेचे आहे.

पारनेर तालुक्याची ढासळलेली प्रतीमा उंचावण्यासाठी प्रयत्न करणेसुद्धा गरजेचे आहे.पारनेरच्या भविष्यासाठी चांगल्या कामासाठी राज ठाकरे यांच्या विचारांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकप्रतिनिधींच्या चांगल्या कामासाठी सोबत राहील परंतु चुकीचे काही आढळल्यास पारनेरच्या हितासाठी विरोध करायला पण मागेपुढे पाहणार नाही.चुकीला चुक बरोबरला बरोबर म्हणण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भुमिका कायम राहील असे मत मनसे नेते अविनाश पवार यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button