इतर

विज कामगार महासंघाचे 20 ते 22 डिसेंबर ला आळंदीत अधिवेशन

पुणे दि 18

महाराष्ट्र वीज कामगार महासंघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) वीज ऊद्योगातील बेसुमार खाजगी करण्याच्या विरोधात संर्घष करणार आहे , या बाबतीत दि 20 ते 22डिसेंबर 2024 फ्रूटवाला धर्मशाळाच्या सभागृहातआयोजित त्रैवार्षीक राज्य अधिवेशनामध्ये सविस्तर चर्चा करून धोरण निश्चीत करणार असल्याचे प्रतिपादन महासंघाचे अध्यक्ष विठ्ठल भालेराव यांनी पुणे श्रमीक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे

, या वेळी मंचावर सरचिटणीस अरूण पिवळ, संघटनमंत्री विजय हिंगमिरे, वरिष्ठ पदाधिकारी सुभाष सावजी उपस्थित होते.
वीज ऊद्योगात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे या मुळे याचा परिणाम कामगारांवर होण्याची शक्यता आहे .
अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या अप्पर मुख्य सचिव ऊर्जा श्रीमती आभा शुक्ला करणार असून महानिर्मिती,महापारेषण आणि वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे प्रमुख अतिथीम्हणूना उपस्थित राहणार आहेत, भारतीय मजदुर संघ पश्चिम क्षेत्र प्रभारी,श्री सी व्ही राजेश , ,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल ढूमने जी,महामंत्री किरण मीलगिर आणि अखिल भारतीय विद्युत मजदुर महासंघाचे अध्यक्ष श्री मधू सुदन जोशी.महामंत्री श्री किशोरीलाल रायकवार हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत . शुक्रवार दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी ठीक ११ वाजता ह्या त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या त्रिभाजनाला २० वर्षे पूर्ण होत आहेत.त्यामुळे त्रिभाजन हे लाभदायी आहे की एकत्रित वीज मंडळ ही संकल्पनाच चांगली यावर ह्या अधिवेशनात विस्ताराने चर्चा होणार आहे व यासाठी महासंघाने तिन्ही कंपन्यांच्या प्रमुखांना आमंत्रित केले आहे तसेच संघटनेचे राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी देखील हे विश्लेषण करणार आहेत.
ह्या अधिवेशनात प्रामुख्याने
खालील विषयांवर प्रस्ताव, चर्चा होऊन ठराव पारित होणार आहेत .
१) वीज ऊद्योगातील अंदाधुंद खाजगीकरणाच्या विरोधात करावयाचे आंदोलनात्मक भुमिका
२) जल विद्युत केंद्रांच्या हस्तांतरण विरोधात कामगार हिताची धोरणात्मक भूमिका .
३) रिक्त पदांवर कार्यरत कंत्राटी कामगारांना कायम करण्या बाबतीत भुमिका.
४) स्मार्ट मीटर बाबत ची संघटनेची भूमिका .
५) महा पारेषण कंपनीत संघटनेला विश्वासात न घेता सुरू असलेले खाजगीकरण
६) सौर ऊर्जा निर्मिती बद्दल संघटनेचे धोरणात्मक भुमिका
७) स्टाफ कमी करण्याच्या उद्देशाने महावितरणची प्रस्तावित पुनर्रचना बाबतीत चर्चा
८ ) महा पारेषण चा तांत्रिक स्टाफ पॅटर्न
९) कंत्राटी कामगार , निवृत्त आणि सहाय्यक कामगारांच्या समस्यां व सोडवण्यासाठी भुमिका
१०) सन्मानाने जगता येईल अशी पेन्शन योजना
याशिवाय संघटनात्मक कार्यक्रम,आगामी तीन वर्षांसाठी पदाधिकारी निवड,प्रस्ताव,स्वतंत्र महिला सत्र हे ह्या अधिवेशनाचे आकर्षण असणार आहे.
एकंदरीतच १५०० च्या वर प्रतिनिधी तीन दिवस चर्चा करून निर्णय घेतील.त्यामुळं आगामी आव्हानांचा साकल्याने विचार करून निर्णय घेण्यासाठी अधिवेशन अत्यंत उपयोगी ठरणार आहे असे प्रतिपादन महामंत्री अरूण पिवळ यांनी केले आहे.
अधिवेशन च्या तयारी पुणे झोन मधील पदाधिकारी, सेवानिवृत्त पदाधिकारी विजय मुळगुंद, सुभाष सावजी, धनंजय इनामदार, सोमवंशी सक्रिय पणे कार्यरत आहेत.
या बाबतीत ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी प्रसिद्धी पत्रका व्दारे दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button