सुपा शहरातील आंबेडकर स्मारकांची दुरुस्ती करा मनसे नेते अविनाश पवार.

दत्ता ठुबे
पारनेर/ प्रतीनिधी-
सुपा शहरातील नगर-पुणे महामार्गावरील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाकडे स्थानिक सुपा ग्रामपंचायतसह सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे
स्थानिक आंबेडकरी जनतेच्या भावना लक्षात घेऊन सुपा शहरातील तमाम सर्व सामान्य जनतेच्या वतीने सुपा ग्रामपंचायतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देऊन शांततेच्या मार्गाने लक्ष वेधण्यात आले
भारतरत्न डॉ. आंबेडकर भवनाचे छत गळत आहे,आतमध्ये स्मारकाला जाळ्या नसल्याने धुळच धुळ, ,गेट खराब असल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे आत्ताच गेल्या आठवड्यात परभणीमध्ये जी घटना घडली समाज कंटकांनी ज्या पद्धतीने गैर कृत्य केले तसं काही इथं झाले तर जिम्मेदार कोण….?
आपण या गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,तात्काळ उपाययोजना करुन दुरुस्ती करावी,
३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी सालाबादप्रमाणे आमचे असंख्य आंबेडकर समाज बांधव मोठ्या संख्येने भिमा कोरेगाव येथे विजय स्तंभाच्या दर्शनासाठी जात असतात तरी रात्री प्रवासा दरम्यान विसाव्यासाठी नगर पुणे महामार्गावरील सुपा येथे आंबेडकर भवनात थांबत असतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपणास आंबेडकर जनतेच्या वतीने विनंती करण्यात येते की आपण आमच्या भावनांचा आदर करुन आंबेडकर भवनाच्या सभागृहातील सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी
आमच्या भावनांचा आदर ठेवला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तसेच आंबेडकर समाज बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागेल व यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर यास पुर्ण पणे सुपा ग्रामपंचायत जिम्मेदार राहिल याची गांभीर्याने दखल घ्यावी ही वेळ सुपा ग्रामपंचायत येऊ देणार नाही अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांच्या सह महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुपा शहर अध्यक्ष अक्षय सुर्यवंशी यांनी व्यक्त केले
.यावेळी जानकु सुर्यवंशी, तुषार बोरगे,सागर गायकवाड, शेखर जाधव, सचिन उमाप,सागर सुर्यवंशी, नितीन जाधव, दिपक सुर्यवंशी,अतिश सुर्यवंशी, विशाल जाधव,बबन औचीते, भैय्या जाधव,सागर भाऊ शिंदेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.