23 ते 30 डिसेंबर या काळात बोटा येथे भव्य अखंड हरीनाम सप्ताह!

संगमनेर ( प्रतिनिधी ) जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमनास 375 वर्ष होत असून या निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळा बोटा ता. संगमनेर जि अहिल्यानगर येथे 23 ते 30 डिसेंबर या काळात आयोजीत केला आहे.
या सोहळ्यात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदयातील दिग्गज महात्मे व संतांचे वंशज यांचे कीर्तन आयोजित केले आहे. या कार्यक्रमात अनुक्रमे कीर्तनकार व प्रवचनकार पुढील प्रमाणे दि. 23 संत एकनाथ महाराज यांचे वंशज योगीराज महाराज गोसावी व अगस्ती देवस्थान चे विश्वस्त राजेंद्र महाराज नवले, दि. 24 संतवीर बंडातात्या महाराज कराडकर व शिवनेरी भूषण राजाराम महाराज जाधव, दि. 25 गाथा मंदिर देहू चे अध्यक्ष पांडुरंग महाराज घुले व अगस्ती आश्रम आळंदि चे अध्यक्ष रामनाथ महाराज जाधव, दि. 26 युवा कीर्तनकार उमेश महाराज दशरथे व वेदांतचार्य दिगंबर महाराज नरवडे, दि. 27 संत नामदेव महाराज यांचे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास व सुरेशराज दादा राहेरकर दि. 28 ज्ञानेश्वर महाराज कदम तथा छोटे माऊली व अगस्ती आश्रम आळंदी चे उपाध्यक्ष सुदाम महाराज कोकणे, दि. 29 संत तुकाराम महाराज यांचे वंशज कान्होबा महाराज देहूकर व द्वाराचार्य रामकृष्णदास लहवितकर यांचे तुका अकाशा एवढा या विषयावर प्रवचन होईल. 30 डिसेंबर रोजी चंद्रशेखर महाराज देगलुरकर यांचे काल्याचे कीर्तन सकाळी 10 वाजता होईल. यानंतर पुरण पोळी चा महाप्रसाद समस्त ग्रामस्थ बोटा तळपेवाडी माळवाडी आळेखिंड केळवाडी कुरकुटवाडी यांच्या वतीने होणार आहे.
संत तुकाराम महाराज पादुका भव्य मिरवणूक सोहळा 29 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता होणार असून या पादुका व परिसरातील पंचक्रोशी तील मंदिरांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी दु. 3वाजता सरपंच श्री जालिंदर गागरे यांचे वतीने करण्यात येणार आहे. संगीत गाथा पारायण सोहळा दररोज दुपारी 4वा , प्रवचन दुपारी 5 वा तर कीर्तन सायं 6.30वा अनेक भाविकांचं उपस्थितीमध्ये होणार आहे. कीर्तनासाठी 375 टाळकरी असणार आहेत. व 375 तरुण देहू ते बोटा अशी दिव्य ज्योती आणणार आहेत. यावेळी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, कृषी प्रदर्शन होणार आहे. रोज आमटी भाकरी चा महाप्रसाद परिसरातील 100 गावांच्या वतीने होणार आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्रातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, गडकरी, टाळकरी, फडकरी, राजकीय सामाजिक क्रीडा साहित्यिक सर्व क्षेत्रातील व सर्व पंथीय मान्यवरांची उपस्थितीत राहणार आहेत.
या कार्यक्रमांस सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त संगमनेर अकोले तालुका वारकरी संप्रदाय, मुळा खोरे पठार भाग, समस्त ग्रामस्थ बोटा, दत्तात्रय महाराज भोर व किशोर महाराज धुमाळ यांनी केले आहे.