इतर

तळचेर, (ओडिशा) येथे अखिल भारतीय ठेका मज़दूर महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न

कंत्राटीकरण हा शोषणाचा नवा मार्ग झाला आहे -श्री रामनाथ गणेशे

तळचेर दि 23 -कंत्राटीकरण हा शोषणाचा नवा मार्ग झाला आहे त्या विरुद्ध लढा देण्याची हीच वेळ आहे “ठेका मज़दूर महासंघ लढा देणारच! योग्य वेतन आणि सुरक्षितता न मिळाल्यास तीव्र आंदोलन होईल सरकारने जर मागण्या मान्य केल्या नाहीत, तर देशव्यापी संप अटळ आहे. असे आवाहन भारतीय मजदूर संघ केंद्रीय सेक्रटरी श्री रामनाथ गणेशे यांनी केले

अखिल भारतीय ठेका मज़दूर महासंघ (AITMM) राष्ट्रीय अधिवेशन तळचेर, (ओडिशा) येथे दिनांक: 22/23 मार्च 2025 येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी विविध राज्यांतील पदाधिकाऱी उपस्थित आहेत. यावेळी ते बोलत होते

तळचेर, ओडिशा येथे देशभरातील कंत्राटी प्रतिनिधी, कामगार नेते आणि औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते
या परिषदेत ठेका कामगारांच्या वेतन, सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा आणि कायमस्वरूपी रोजगारासंबंधी महत्त्वाच्या मागण्यांवर ठराव मंजूर करणार आहेत.

  1. कायमस्वरूपी रोजगाराची हमी: ठेका कामगारांना त्यांच्या दीर्घकालीन सेवेनुसार कायमस्वरूपी करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.
  2. समान काम, समान वेतन: ठेका आणि नियमित कामगारांना समान वेतन आणि सुविधा द्याव्यात.
  3. कामगार सुरक्षा आणि आरोग्य: कोळसा खाणींमध्ये आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये कामगारांसाठी आधुनिक सुरक्षा प्रणाली लागू करावी.
  4. सामाजिक सुरक्षा योजना: EPF, ESI आणि निवृत्ती वेतन यासारख्या योजना ठेका कामगारांसाठी सक्तीच्या कराव्यात.
  5. खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाचा विरोध: सरकारी उपक्रमांमध्ये ठेका पद्धतीने होणाऱ्या शोषणाविरोधात कठोर कायदे करावेत.

अधिवेशनात ठोस इशारा दिला की, जर सरकार आणि औद्योगिक व्यवस्थापनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर राष्ट्रव्यापी आंदोलन छेडण्यात येईल.

AITMM चे राष्ट्रीय अध्यक्ष के. व्ही राधाकृष्णन म्हणाले:
“हा लढा केवळ ठेका मजुरांसाठी नाही, तर देशातील प्रत्येक मेहनती कामगारांच्या न्यायासाठी आहे. सरकारने आता ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही देशव्यापी आंदोलन करू.”

भारतीय मजदूर संघ ओरीसा महामंत्री पृथ्वीराज पांडा यांनी ही परिषद ठेका मजुरांच्या हक्कांसाठी निर्णायक पाऊल ठरेल. कामगारांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी लढण्याची गरज आहे. असे मनोगत व्यक्त करून ठेका मजदूरांनी भारतीय मजदूर संघ सोबत एकत्रित येऊन संघर्ष करण्यात आले .

मंचावर भारतीय मजदूर संघ केंद्रीय सेक्रटरी वेलु राधाकृष्णन, त्रिपुरा भारतीय मजदूर संघ महामंत्री तपन डे, मनोज प्रधान उपस्थित होते. सूत्रसंचलन अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ महामंत्री सचिन मेंगाळे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीनिवास राव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button