मेडिकव्हर हाॅस्पिटलच्या वतीने पत्रकारांची आरोग्य तपासणी!

संगमनेर पत्रकार मंचचा उपक्रम
संगमनेर (प्रतिनिधी)
लोकशाही समाजव्यवस्थेत माध्यम आणि त्यांचे प्रतिनिधी यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र अनेक वेळा हा घटक दुर्लक्षित राहतो. बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसा तो पत्रकारांचाही झाला आहे. त्यामुळे संगमनेर पत्रकार मंच व संपूर्ण भारतात उत्तम आरोग्य सेवेसाठी नावाजलेले येथील मेडिकव्हर हाॅस्पिटल यांच्या वतीने येथील पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात एसपी ओ टु, ब्लड प्रेशर, ईसीजी, टुडी ईको, टी एम टी टेस्ट करण्यात आली. यावेळी कार्डियोलोजिस्ट डॉ.चेतन जैन यांनी गरजेनुसार उपचार व आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
माध्यमातील प्रतिनिधी हे जनतेच्या प्रश्नांसाठी, वृत्तांकनासाठी काळ वेळ, परिस्थिती विसरून काम करत असतात. प्रसंगी त्यांचे आपल्या आरोग्याकडेही दुर्लक्ष होते. कोविड काळातही हा घटक सर्वसामान्यांसाठी जीव धोक्यात घालून काम करत होता. अशा या महत्त्वाच्या घटकाचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी संगमनेर पत्रकार मंच यांच्या पुढाकाराने व संगमनेर मेडिकव्हर हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच गरजेनुसार उपचार व सुदृढ आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य सेवेसाठी जनतेचा विश्वास संपादन करणारे मेडिकव्हर हाॅस्पिटल अशी ओळख असणाऱ्या या हाॅस्पिटलचे शाखा प्रमुख संजोय समंथा यांचा यावेळी पत्रकार मंचच्या वतीने सत्कार व आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी मेडिकव्हर हाॅस्पिटलचे मार्केटिंग व्यवस्थापक दिपक जाधव, असिस्टंट मॅनेजर योगेश चौधरी, क्वालिटी मॅनेजर संजय व्यास, संतोष गोडसे, सुयोग नाईक तसेच पत्रकार मंचचे अध्यक्ष गोरक्षनाथ मदने, उपाध्यक्ष गोरक्ष नेहे, सचिव संजय आहिरे, सोमनाथ काळे,सतीश आहेर, मंगेश सालपे, भारत रेघाटे, निलीमा घाटगे, अमोल मतकर ,संजय साबळेआदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.