राजूर पोलीस आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना न सापडणारी अवैध दारू तरुणांनी पकडली

अकोले प्रतिनिधी
राजूर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टीच्चून दारुबंदी असलेल्या राजूरच्या भर बाजारपेठेत वाहनासह सुमारे दीड लाख रुपायाचा अवैध दारुसाठा तरुणांनी पकडला.
हा साठा पकडून तरुणांनी राजूर पोलीसांच्या ताब्यात दिला. या घटनेने पोलीस अवैध दारु विक्रेत्यांसोबतच्या अर्थपूर्ण संबधाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. असल्याने अशा लागेबंध असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांसह संबंधित विभागाच्या अधिकारी,
कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तरुणांनी केली आहे. आदिवासी विभागाची बाजारपेठ असलेल्या राजूर गावात २१ ऑक्टोबर २००५ साली दारूबंदीचा ठराव पारित होऊन दारुबंदी करण्यात आली. बाजारपेठेतील अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी कागदोपत्री करण्यात आली. हे व्यवसाय बंद झालीच नाहीत. उलट मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढत चाललेय. अनेकदा
पोलिसांकडे अवैद्य व्यवसायाच्या तक्रारी करूनही अवैद्य दारू, मटका, जुगारला पायबंद घालण्यात पोलिस आणि दारु उत्पादन शुल्क विभागाची यंत्राणा कुचकामी ठरल्याचे तरुणाच्या लक्षात आले.
विक्रम अशोक घाटकर रा. राजूर या दारू विक्रेत्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. अवैध दारू विक्रेत्यांना आशावाद असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर जिल्हा अधीक्षक राकेश ओला यांनी चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन देशमुख, अक्षय देशमुख यांनी केली आहे यातून आज संतप्त तरुणांनी अवैध दारु साठ्याबरोबरचं
पोलिसांना अवैध दारुसाठा का सापडत नाही अवैध दारु जवळ बाळगुन विक्री करणाऱ्या विक्रम अशोक घाटकर रा. राजूर यांवर राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूबंदी असलेल्या राजुर गावात तरुणांना अवैध दारू साठ्यासह वाहन मिळून येते. परंतु राजुर पोलीस आणि दारू उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना अवैद्य दारू साठा आढळून येत कसा
नाही असा सवाल उपस्थित होत आहे. राजुर मध्ये दोन दिवसापासून डांगी जनावरचे प्रदर्शन असल्याकारणामुळे दारूबंदी असलेल्या राजुर गावात
अवैद्य रित्या दारू विक्री व मटका तसेच अवैध व्यवसाय
बंद करावे म्हणून राजुर पोलीस स्टेशचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्याशी संपर्क साधून अवैद्य व्यवसाय बंद करण्याबरोबरचं अवैद्य व्यवसाय
करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत राजूर ग्रामपंचयतणे लेखी पत्र दिले आहेत
पुषाताई निंगळे, सरपंच, राजूर.