शांती फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर,5 जानेवारीला वितरण

उलटा चष्मा फेम डॉ.राजेश आहेर यांना नाट्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार!
तमाशा क्षेत्रातील योगदानाबद्दल रघुवीर खेडकर यांना कलाभूषण पुरस्कार!
संदीप वाकचौरे यांना पत्रकारीता, साहित्य शिक्षण क्षेत्रासाठीचा सावित्रीबाई फुले पुरस्कार!
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर येथील शांती फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा माजी नगराध्यक्षा दूर्गाताई तांबे यांनी ही घोषणा केली. 5 जानेवारीला या पुरस्कारांचे विविध मान्यवरांचे उपस्थित सन्मान केला जाणार आहेत.
नाट्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल आणि मराठी, हिंदी विविध दूरचित्र वाहिन्यांवरील मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे उलटा चष्मा फेम डॉ.राजेश आहेर यांना नाट्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. तमाशा क्षेत्रात योगदान देऊन ग्रामीण व शहरी जनतेचे मनोरंजन करतानाच प्रबोधनाची परंपरा चालवणारे जेष्ठ कलावंत आणि महाराष्ट्र राज्य लोकनाट्य मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांना कांताबाई सातारकर लोक नाट्य कलाभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. शिक्षण, साहित्य, पत्रकारीता क्षेत्रासाठीचा सावित्रीबाई फुले पुरस्कार शिक्षण अभ्यासक संदीप वाकचौरे यांना घोषित करण्यात आला आहे. वाकचौरे यांनी 15 पेक्षा अधिक पुस्तकाची लेखन केले आहेत. महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रासाठी स्तंभलेखन करत आहे. राज्य शासनाच्या विविध समित्यांवरती ते कार्यरत आहेत. त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
पुरस्काराचे वितरण 5 जानेवारी रोजी संगमनेर येथे करण्यात येणार आहेत. यावेळी डॉ.सोमनाथ मुटकुळे लिखित दहा नाट्य पुस्तकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.नाट्यसृष्टीत लेखन, अभिनय, दिग्दर्शनात राज्यस्तरावरी विविध पारितोषिक प्राप्त ही नाटके असणार आहेत. पुरस्काराचे वितरण व लोकार्पण ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत संजय सोनवणी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे माजी सदस्य डॉ.सुधीर तांबे असणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजेभोसले, चपराक प्रकाशनाचे प्रमुख ज्येष्ठ संपादक घनश्याम पाटील, दुर्गाताई तांबे कार्यक्रमास प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार निवड समिती सदस्य म्हणून डॉ. सोमनाथ मुटकुळे, सूर्यकांत शिंदे ,माधवी देशमुख यांनी काम पाहिले. जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.