आबासाहेब काकडे विद्यालयात संविधान दिन साजरा

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवगाव येथे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला .
यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य संपतराव दसपुते, उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर, पर्यवेक्षिका श्रीमती पुष्पलता गरुड ,पर्यवेक्षक सुनील आव्हाड , पर्यवेक्षक शिवाजी पोटभरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले .प्रा अशोक तमनर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत,भारतीय संविधान हे जगातील एक आदर्श संविधान आहे. संविधानामुळे देशातील नागरिकांना हक्क व कर्तव्य मिळालेली आहेत ,सर्वांनी संविधानातील मूल्याची जपवणूक करावी असे सांगितले.विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आदर्श नागरिक बनावे असेही ते म्हणाले .
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन प्रतिमा अकोलकर यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप सायली घोडेचोर यांनी केला.