रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे कृषी पर्यटन
नाशिक/ प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक सभासदांचे कृषी पर्यटन दिंडोरी तालुक्यातील वारे शिवारातील टिटवे या आदिवासी बहुल गावात आयोजित करण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ नाशिक सहसा सभासदांना अशा ठिकाणी कृषी पर्यटन साठी घेऊन जातात जेथे एरवी कोणास जाता येणार नाही. टिटवे हे गाव स्ट्रॉबेरी शेतीसाठी प्रसिद्ध असून या गावातील शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांपेक्षा स्ट्रॉबेरी पिकाकडे लक्ष केंद्रित करून आपले आर्थिक उत्पन्न वाढविले आहे. याप्रसंगी रोटरी क्लब सभासद आणि कुटुंबीयांनी स्ट्रॉबेरी शेतामध्ये जाऊन स्वतः स्ट्रॉबेरी तोडून खाण्याची मजा लुटली व सभोवतालच्या परिसरात ट्रॅक्टरने भटकंती करून आदिवासी
शेतकऱ्यांमध्ये मिसळले. येथील स्ट्रॉबेरी सुरत व आमदाबाद येथे विक्रीसाठी पाठविली जाते . याप्रसंगी कृषी तज्ञ डॉक्टर रामनाथ जगताप आणि विभागीय कृषी अधिकारी योगेश खैरनार आणि शामकांत पाटील यांनी या परिसरातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी शेतीची अद्यावत माहिती व तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले.

या परिसरातील बहुसंख्य शेतकरी या कृषी मंथन कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या शेतकऱ्यांकडून रोटरी सभासदांनी किमान 30 हजार रुपयांची स्ट्रॉबेरी खरेदी केली व नंतर येथील बचत गटाने तयार केलेल्या गावरान भोजनाचे आस्वाद घेतले.
याप्रसंगी आदिवासी शेतकऱ्यांशी संवाद साधताना अध्यक्ष ओम प्रकाश रावत यांनी या परिसरातील बचत गटांना मायक्रो क्रेडिटच्या माध्यमातून आर्थिक सहयोग करण्याचे आश्वासन दिले व येथील शेतकऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी ची सोय पण उपलब्ध होईल असे सांगितले. कृषी पर्यटन आयोजनासाठी मंथ लीडर्स भरत बिरारी व डॉ अक्षिता बुरड, कम्युनिटी सर्विस मेडिकल डायरेक्टर मकरंद चिंधडे दमयंती बरडिया, राजेश्वरी बालाजी वाले यांनी विशेष मेहनत घेतली. सचिव शिल्पा पारख यांनी आभार मानले
