नाशिक मध्ये राबविले लिंग आधारित हिंसाचार जनजागृती अभियान!

नाशिक प्रतिनिधी / डॉ. शाम जाधव
पारिघा वेल्फेअर फाउंडेशन व जिल्हा महिला बाल विकास नाशिक अंतर्गत संयुक्त विद्यामाने लिंग आधारित हिंसाचार जनजागृती कार्यक्रम नाशिक येथे सम्पन्न झाला . कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून करण्यात आले

यावेळी
लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा, पीडित भरपाईवर लक्ष केंद्रित करणे,
“चांगला स्पर्श-वाईट स्पर्श ओळखणे,” निरोगी नातेसंबंधांना प्रोत्साहन देणे आणि महिला आणि मुलींच्या प्रतिष्ठेचा आदर करणे यासारख्या विषयांवर कार्यशाळा आणि परिसंवाद राबविणे.
बालविवाह प्रतिबंध कायद्याबाबत जनजागृती .तसेच
राष्ट्रीय पातळीवर २४ तास बालकांसाठी असलेली चाइल्ड हेल्प लाईन १०९८ याबाबत जनजागृती. करण्यात आले
परिघा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सौ मीनाक्षीताई शेगांवकर यांनी ह्या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले महिलांनी नातेवाईकांनी हा विषय समजून घेऊन तो जाणून घेतला त्याप्रसंगी श्री प्रवीण विजय आहेर पद चाइल्ड हेल्पलाइन सुपरवायझर व श्री सचिन हरिभाऊ शिराळ पद हेल्पलाइन केस वर्क यांचेही मार्गदर्शन लाभले
