आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०६/०५/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १६ शके १९४६
दिनांक :- ०६/०५/२०२४,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:००,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५१,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति १४:४१,
नक्षत्र :- रेवती समाप्ति १७:४३,
योग :- प्रीति समाप्ति २४:२८,
करण :- विष्टि समाप्ति २५:१०,
चंद्र राशि :- मीन,(१७:४३नं. मेष),
रविराशि – नक्षत्र :- मेष – भरणी,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मेष,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- त्रयोदशी वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०७:३७ ते ०९:१३ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:०० ते ०७:३७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:१३ ते १०:५० पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३९ ते ०५:१५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:१५ ते ०६:५१ पर्यंत,
❀ दिन विशेष:
शिवरात्रि, शुक्र पूर्व लोप, भद्रा १४:४१ नं. २५:१० प., त्रयोदशी – चतुर्दशी श्राद्
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आजचा दिवस सुखाचा जावो मन प्रसन्न राहो!!!!!
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १६ शके १९४६
दिनांक = ०६/०५/२०२४
वार = इंदुवासरे(सोमवार)
मेष
छोट्याश्या गोष्टींनी नाराज होऊ नका. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव मनात जागृत ठेवा. सर्वांशी गोडीने वागाल. कोणत्याही प्रकारचा उतावीळपणा करू नका. कामाची अचूक आखणी करावी.
वृषभ
तुमच्यातील प्रतिभा जागृत ठेवा. मुलांबाबत शंका मिटतील. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा. उत्तम वाहन सौख्य लाभेल. गुरुकृपेचा लाभ घेता येईल.
मिथुन
कामानिमित्त प्रवास करावा लागेल. सतत कार्यमग्न राहाल. खिशाला कात्री लागू शकते. लहान-सहान कामासाठी धावपळ होईल. झोपेची तक्रार जाणवेल.
कर्क
मानसिक ताण जाणवू शकतो. योग्य संधीची वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. काहीसे हट्टीपणाने वागाल. नवीन लोक संपर्कात येतील.
सिंह
उष्णतेचा त्रास जाणवेल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. मनातील योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. आजचे काम उद्यावर ढकलू नका. जबाबदारी निभावून नेता येईल.
कन्या
प्रवासातील क्षुल्लक अडचणी टाळाव्यात. पाय खेचणार्या लोकांकडे लक्ष ठेवावे. अपचनाचा त्रास जाणवेल. कामातील तांत्रिक बाजू लक्षात घ्याव्यात. प्रलोभनाला भुलू नका.
तूळ
आरोग्याकडे लक्ष ठेवावे. नवीन गुंतवणुकीला वाव मिळेल. अनाठायी खर्च वाढू शकतो. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रेस जुगारा पासून दूर राहावे.
वृश्चिक
जोडीदाराशी मतभेदाची शक्यता आहे. घरातील वातावरण शांततापूर्ण ठेवावे. प्रवास जपून करावा. घरगुती कामात अधिक वेळ अडकून पडाल. आर्थिक गणित नव्याने मांडावे लागेल.
धनू
हातातील अधिकार योग्य ठिकाणी वापरा. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. आरोग्यात काहीशी सुधारणा संभवते. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. मनातील अरसिकता काढून टाकावी.
मकर
कामानिमित्तचा प्रवास सावधानतेने करावा. जोडीदाराशी मतभेद संभवतात. रागावर नियंत्रण ठेवावे. भागीदारीच्या व्यवसायात सबुरी बाळगावी. तिखट व तामसी पदार्थ खाल.
कुंभ
पित्त विकाराचा त्रास संभवतो. क्षुल्लक कारणाने डोकेदुखी वाढू शकते. घाईघाईने कोणतेही काम करू नका. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. नवीन लोकांच्यात मिसळावे.
मीन
सामुदायिक वादापासून दूर राहावे. मुलांच्या गोष्टी विरोधी वाटू शकतात. मानसिक चंचलता जाणवेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. अनाठायी खर्च टाळावा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर