जिल्हा बँक शेतीतज्ञ समिती सदस्यपदी कृषिभूषण सयाजीराव पोखरकर यांची फेरनिवड!

अकोले प्रतिनिधी: –
अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन २०२४-२५ सालातील पीक कर्ज विषयक धोरण ठरवण्यासाठी नियुक्त केलेल्या शेतीतज्ञ समितीच्या सदस्य पदी कोतुळ,(तालुका – अकोले )येथील कृषिभूषण सयाजीराव पोखरकर यांची फेर निवड करण्यात आली आहे.
जिल्हा बँक विविध पिकांचे वार्षिक कर्ज विषयक धोरण नाबार्डच्या निकषानुसार आणि सूचनानुसार ठरवीत असते पिकाबरोबरच पशुपालन ,पक्षी पालन, मत्स्य व्यवसाय या करिता खेळते भांडवल उपलब्ध करून देणे.संबंधित कर्जदार विषयक धोरण निश्चित करण्यासाठी ,या समितीची नियुक्ती केली जाते. श्री.सयाजीराव पोखरकर हे स्वतः कृषी पदवीधर असून त्यांची मागील वर्षी ही या समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली होती
.श्री.पोखरकर हे कोतुळ येथील प्रयोगशील शेतकरी असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना शेतीमित्र 2013 व वसंतराव नाईक कृषिभूषण 2020 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हा बँकेचे संचालक आणि अगस्ती कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी सिताराम पाटील गायकर ,आमदार डॉक्टर किरणजी लहामटे,आमदार आशुतोष काळे, मा.आमदार चंद्रशेखर घुले,अमित दादा भांगरे ,मधुकरराव नवले यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
———-