साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्काराने ज्ञानेश्वर राक्षे सन्मानित

मुंबई दि १२ –साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्काराने ज्ञानेश्वर राक्षे सन्मानित समाज कल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्काराने ज्ञानेश्वर राक्षे सन्मानित
मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर राक्षे यांना शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुखमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे,आमदार अग्रवाल,समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोडीया, समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे,बर्टीचे सुनील वारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील नरिमन पॉईंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्ट्स जमशेटजी भाभा नाट्यगृह,एनसीपीए मार्ग येथे मंगळवार दि 12/3/24 रोजी झालेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्ञानेश्वर राक्षे व सौ संगिता राक्षे, माधवी राक्षे यांना साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊं साठे पुरस्काराने गौरविण्यात आले.
समाज कल्याण क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्यासाठी,समाजाच्या उन्नतीसाठी,शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मुलन, जनजागरण इत्यादी क्षेत्रातील कार्याबद्दल हा पुरस्कार शासनाच्या वतीने दिला जातो.
मागील 30 वर्षांपासून ज्ञानेश्वर राक्षे हे करत असलेल्या सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल शासनाने दखल घेऊन त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे
या पुरस्काराबद्दल ज्ञानेश्वर राक्षे यांचेवर समाजातील सर्वच थरातुन अभिनंदननाचा वर्षाव होत आहे,मातंग एकता आंदोलन, संगमनेर साहित्य परिषद, ग्राहक पंचायत महा.राज्य,वैद्यकीय प्रतिनिधी संघटना,बारा बलुतेदार संघटना,स्वामी समर्थ परिवार यांनी विशेष अभिनंदन केले, पुरस्कार स्वीकारतेवेळी संगमनेर येथील सुनील पवार सर,संपतराव राक्षे,राजेंद्र आव्हाड,दत्ताभाऊ लाहुंडे, संजय जमधडे,संदीप आव्हाड,राजेंद्र राक्षे,देवेंद्र साळवे,मयुर राक्षे, मनिष राक्षे,वेदांत राक्षे,सिद्धांत राक्षे हे उपस्थित होते