नंदीध्वज बनवा.. जिंका बक्षीसे’.. या स्पर्धेत विद्यार्थ्यांची उत्स्फूर्तपणे सहभाग..

.
यात्रेआधीच पूर्वभागात
अवतरल्या ‘लहान नंदीध्वज’
‘
सोलापूर – सोलापूरात दरवर्षी मकर संक्रांतीला ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराजांचे यात्रा भरतो. यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘अक्षता सोहळा’ व ‘नंदीध्वज’ पाहण्यासाठी विविध राज्यांमधून आणि विदेशातून सुद्धा भाविक भक्त आवर्जून येतात. लहान मुलांचे आकर्षण असणा-या ‘नंदीध्वजा’चे विषयाचे औचित्य साधून सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संघम व पद्मकमळ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहर व जिल्ह्यातील ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नंदीध्वज बनवा.. जिंका बक्षीसे… अशी अनोखा स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
स्पर्धा संपल्यानंतर लगेचच निकालाची घोषणा करुन बक्षीसे देण्यात आले.
स्पर्धेच्या निमित्ताने सर्वधर्मसमभाव दिसून आले, या स्पर्धेत विविध समाजांसह मुस्लीम समाजाचा विद्यार्थीही सहभागी झाला होता. अनेक विद्यार्थी आकर्षक दिसतील अशाचपध्दतीने नंदीध्वज बनवले होते. विडी घरकुल येथील बसवेश्वर मराठी विद्यालयाचा पाचवीतला वल्लभ चंद्रगिरी बोल्ली याने प्रथम क्रमांक पटकावला. याच विद्यालयातील सातवीचा आसिद असफ शेख याने द्वितीय क्रमांक जिंकला. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक बसवेश्वर विद्यालयातील नवनीत अंबादास अमृतम याने मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून निलकंठेश्वर प्रशालेची सातवीची विद्यार्थिनी गौतमी गोपाल चिन्नी,ऑल इज वेल सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित, स्पेड्क सेंटर सोलापूर या शाळेचा दिगंबर मधुकर मांतुवाद तर भू. म. पुल्ली कन्या प्रशालेतील सोनाक्षी लक्ष्मण मेरगू हिने पारितोषिक जिंकले. यावेळी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ‘प्रमाणपत्र’ देण्यात आले. स्पर्धेचे परिक्षक म्हणून सुरेश येमूल यांनी पाहिले. पद्मकमळ प्रतिष्ठानचे संस्थापक गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी स्पर्धेसाठी बक्षीसे दिले असून फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आले.
पद्मशाली सखी संघमचे अध्यक्षा मेघा इट्टम, उपाध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, सचिवा पूजा चिप्पा, सल्लागार ममता मुदगुंडी, कल्पना अर्शनपल्ली, माजी सहसचिवा ममता तलकोकूल, कार्यकारिणी सदस्या वनिता सुरम, पल्लवी संगा, ॲड. मेघना मलपेद्दी, हेमा मैलारी, पद्मा मेडपल्ली, सोनाली तुम्मा, फाउंडेशनचे सल्लागार दयानंद कोंडाबत्तीनी, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, श्रीनिवास पोटाबत्ती, वैकुंठम् जडल, सतीश चिटमील यांच्यासह आदींचे स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य मिळाले.

नंदीध्वज बनवण्यात दंग असलेले विद्यार्थी.
