बिताका जायनावाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

अकोले /प्रतिनिधी–
अकोले तालुक्यातील दुर्गम भाग असलेले जायनावाडी बिताका येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक महेश भांगरे या चिमुरड्याच्या वाढदिवसानिमित्ताने शैक्षणिक बॅग व लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले.
मौजे जायनावाडी तालुका अकोले येथील रहिवासी असलेले महेश भांगरे हे मा.सुधीरजी मुनगंटीवार मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाचा हार्दिक याचा सहावा वाढदिवस हा त्यांच्या मूळ गावी जायनावाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करणे बाबत नियोजन केले
या निमित्ताने जायनावाडी व बिताका या दोन्ही गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक बॅग व शालेय लेखन साहित्य यांचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने महेश भांगरे यांचे संपूर्ण कुटुंब हे शाळेमध्ये उपस्थित होते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागतगीत म्हणून स्वागत केले व आलेल्या मान्यवरांचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने हार्दिक महेश भांगरे यांस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी व उपस्थित ग्रामस्थांनी वाढदिवसाच्या निमित्ताने उज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या..!!
याप्रसंगी ग्रामपंचायत जायनावाडी बिताका सरपंच बाळू डगळे,उपसरपंच मनीषा भांगरे , सदस्य बाजीराव भांगरे,पंढरी पेढेकर,वनिता पेढेकर,ललित भांगरे,हरिदास भांगरे,किसन पेढेकर,निवृत्ती भांगरे,रामदास भांगरे,बाळु मेंगाळ,ग्रामसेवक बापू राजळे,गवळी मॅडम,गोडे सर,भोजने सर,पवार मॅडम व जायनावाडी बिताका या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोडे सर यांनी केले व ग्रामसेवक बापू राजळे यांनी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले.