इतर

जिल्ह्यात ५ लाख सदस्य नोंदणीचे उदिष्ट भाजपा च्या कार्यकर्त्यांनी पूर्ण करावे :- आ. मोनिका राजळे

भाजपा सदसत्व नोंदणी कार्यशाळा संपन्न


लोणी /प्रतिनिधी

भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष असून या पक्षाचे आपण कार्यकर्ते असल्याने आपल्या पक्षाची सर्वात जास्त नोंदणी आपल्या बुथवरती करावी व नगर जिल्ह्याला असलेले पाच लाख सदस्याचे उदिष्ट पूर्ण करावे असे मत शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केले
भाजपा उत्तर नगर जिल्हा सदस्यता अभियान 2024 व सदस्य नोंदणी प्रारंभ कार्यशाळा लोणी येथील जनसेवा कार्यालयात संपन्न झाली. यावेळी भाजपा सरचिटणीस तथा सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख सिताराम भांगरे जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, नितीन कापसे, सोशल मीडिया सेलचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, युवा मोर्चा प्रदेश सचिव श्रीराज डेरे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानवडे, रघुनाथ बोठे आदी उपस्थित होते.
आमदार मोनिका राजळे बोलताना पूढे म्हणाल्या की, भारतीय जनता पार्टी च्या घटनेनुसार लोकशाही पद्धतीने सभासद नोंदणी करून पक्षाचे पदाधिकारी निवडले जातात. आपण बूथवर किमान दोनशे सदस्य करायचे आहेत. भाजपा चा जो कार्यकर्ता जास्तीत जास्त सदस्य करील त्यास पुढील निवडणुका तिकिट अथवा पक्षातील पदे मिळतील असेही त्यांनी सांगितले
जिल्हा संयोजक सीताराम भांगरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान असून आपल्या मतदार संघात किमान साठ हजार सभासद नोंदणी करावी. जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर यांनी शिर्डी येथे पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. यामध्ये आपल्या जिल्ह्याची सर्वाधिक नोंदणी असावी. जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे यांनी सभासद नोंदणी करताना सर्व समाज घटकांना यात सामावून घेण्याचे आवाहन केले.
श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दिपक पटारे, संगमनेर तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, अकोले तालुकाध्यक्ष यशवंत आभाळे, राहता तालुकाध्यक्ष दिपक रोहम, श्रीरामपूर शहर अध्यक्ष मारुती बिंगले, नेवासा सोशल मीडिया संयोजक आदिनाथ पटारे, राहुल देशमुख, विकास गुळवे यांनी आपले मत व्यक्त केले.
सोशल मीडिया सेल चे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाच लाखा पेक्षा जास्त सदस्य नोंदणी करण्याचा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रम यशश्वितेसाठी अशोक भुसाळ, आनंद बुधेकर यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button