चुंभळेश्वर पर्यटन स्थळाला तिर्थक्षेत्र दर्जा प्राप्त करून देण्यासाठी पाठपुरावा करणार- वृक्षमित्र सचिन शेळके
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी-
ज्येष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांच्या जन्मदिनानिमित्त नारायणगव्हाण येथिल चुंभळेश्वर महादेवाच्या डोंगरावर वृक्षारोपन सप्ताह सुरू होताच वृक्षारोपनाच्या पहिल्याच दिवशी वरुण राजाचे आगमन झाले तरी वृक्षप्रेमींनी दिवसभर भर पावसात वृक्षारोपन करत पावसाचा आनंद घेत वृक्षारोपन अभिमान राबवले. नगर-पुणे महामार्गावरील प्रख्यात नारायणगव्हाण पंचक्रोशीतील चुंभळेश्वर महादेवाच्या डोंगरावर विविध उपक्रमांचे याठिकाणी आयोजन सातत्याने होत असुन याठिकाणी अनेक भाविक भक्त, निसर्गप्रेमी सातत्याने येवून भक्तीबरोबर वनराईचा आनंद लुटत असतात त्याचबरोबर प्रख्यात चुंभळेश्वरावर विविध गावोगावच्या शाळेच्या सहली येत असुन चुंभळेश्वर महादेवाच्या डोंगरावर महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोठा सप्ताह याठिकाणी भरतो.
जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांनी पुजन केलेल्या झाडाचेही रोपन या अभियानाअंतर्गत करण्यात आले असुन अप्रत्यक्षपणे आण्णांचे आशिर्वाद वृक्षारोपन अभियानास मिळाले.संतांनी अनेक ओव्यांमधून व अभंगांमधून वृक्षांचे महत्व समाजाला पटवून दिलेले आहे त्या संदेशाचे पालन याठिकाणी होताना दिसत आहे.
त्याचबरोबर चुंभळेश्वर वृक्षारोपन वृक्षसंवर्धन वनसंरक्षक समितीचे सचिन शेळके यांच्या पुढाकाराने दरवर्षी निसर्गप्रेमींच्या व ग्रामस्थांच्या लोकसहभाग श्रमदानातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन,वनसंरक्षणाचे कार्य पार पडत असुन यावर्षी जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत वृक्षमित्र सचिन शेळके यांच्या नियोजनातून ५०० झाडांची लागवड करत वृक्षारोपन सप्ताहास दि.२५ जून रोजी प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. संचित खोले, विकास नाईक,नंदा जगताप, सुवर्णा शेळके, विद्या पवळे, दिपाली धावडे, सविता शेळके,सुजाता जाधव, रेशमा हारदे,विद्या शेळके, आश्विनी लोखंडे ,शबाना शेख व अनेक वृक्षप्रेमी बालमित्रांनी दिवसभर महाश्रमदान केले. यावेळी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समिती सदस्य राहुल पाटील शिंदे, जिल्हा परिषद सदस्या राणीताई निलेश लंके,कर्नल साहेबराव शेळके, कडूस गावचे सरपंच मनोज मुंगसे,नारायणगव्हाण सरपंच मनिषाताई जाधव, ग्रामपंचायत सदस्य विनायक शेळके, बाळासाहेब जाधव, चंद्रकांत हारदे, ग्रामपंचायत सदस्या शायदाभाभी शेख यांनी यावेळी वृक्षलागवड अभियानास भेट देवून शुभेच्छारूपी प्रोत्साहन दिले त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी आयोजकांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानत यशस्विरीत्या कार्यक्रम संपन्न झाला असे वृक्षमित्र सचिन शेळके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.