नाशिक मध्ये पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर

नाशिक – दि. ६ जानेवारी २०२५ रोजी पत्रकार दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ नाशिक व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ ,नामको हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने संपादक,वार्ताहर ,माध्यम प्रतिनिधी त्यांचे कुटुंबिय व पुरस्कारार्थी यांचे करिता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या करून औषधोपचार करण्यात येणार आहेत. तसेच ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांना सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे.
६ जानेवारी रोजी सकाळी ९ ते १ या वेळात रोटरी क्लब हॉल, गंजमाळ शालिमार जवळ नाशिक येथे संपन्न होणार आहे.
यात खालील चाचण्या करण्यात येणार आहेत अशी माहिती नामको चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव शशिकांत पारख ह्यानी दिली.
1.ब्लड प्रेशर 2.साखर पातळी , 3. ईसीजी, 4.डोळे तपासणी, 5. CBC ( Blood Check up), 5.जनरल फिजिशियन डॉक्टर तपासणी ज्यांना या शिबिरात सहभागी व्हायचे आहे त्यांनी कृपया आगाऊ नोंदणी मोबाईल क्रमांक 9850981210 यावर करावी.
जास्तीत जास्त पत्रकारांनी व त्यांच्या कुटुंबियांनी तसेच पुरस्कारार्थीनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब नाशिकचे अध्यक्ष ओमप्रकाश रावत , सचिव (प्रशासन)शिल्पा पारख,सचिव (प्रकल्प) हेमराज राजपूत, अनिल सुकेणकर, आर्की मकरंद चिंधडे,संतोष साबळे,,जनसंपर्क संचालक निलेश सोनजे ,महेंद्र देशपांडे, विनायक देवधर , डॉ अक्षता बुरड,अॅड विदुलता तातेड ,अमित चौघुले ,अनुजा चौघुले यांनी केले आहे.