कळसुबाईचे शिखर सर करत राज्यातील ५० दिव्यांगांचे नव वर्ष स्वागत

अकोले /प्रतिनिधी-
शिवुर्जा प्रतिष्ठाण दुर्ग भ्रमण संस्था सलग तेरा वर्षांपासून राज्यातील दिव्यांगाना सोबत घेऊन नवीन वर्षांचे स्वागत कळसूबाई शिखरावर करत आहे.
भटकंतीचा आनंद इतर दिव्यांगानाही मिळावा यासाठी शिवुर्जा प्रतिष्ठाणची स्थापना केली आहे.खास दिव्यांगासाठी दर महिन्याला एक किल्ला व नव वर्ष स्वागत ऊर्जा मोहिम कळसूबाई शिखरावर शिवुर्जा प्रतिष्ठाण आयोजित करत आहे.यावर्षी सलग तेराव्या वर्षी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.या मोहिमेत राज्यातील पुणे,नाशिक,बीड, ठाणें,अकोला बुलढाणा,अहिल्या नगर,रायगड, सोलापूर छत्रपती संभाजीनगर, जळगाव इत्यादी जिल्ह्यातील दिव्यांग सहभागी झाले होते.शिवूर्जा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली.शिखरवाटेतील मोठमोठे दगड धोंडे ओलांडत,घसरणीचे तीव्र उतार पार करत,लोखंडी शिड्या पार करत शेवटच्या टप्प्यात अंधारात या दिव्यांगानी शिखर गाठले.दिव्यांग क्षैत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बारा दिव्यांगाना दिव्यांग ऊर्जा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष अंकुश निर्मळ हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक पांडूरंग महाराज खाडे,उपसरपंच गणेश खाडे
दिव्याग टेनर खंडू कोटकर,अंकूश खाडे हे उपस्थिती होती. कचरू चांभारे यांनी सर्व दिव्यांग व्यक्तीच्या धाडसाचे कौतुक करत ऊर्जा पुरस्कारामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवूर्जा प्रतिष्ठानचे शिविजी गाडे,कचरू चांभारे, जगन्नाथ चौरे,सागर बोडके, ज्ञानेश्वर डगळे, कल्याण घोलप,जीवन टोपे,अंजली प्रधान यांनीविशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बीड येथील शरद गायके यांनी केले.

पंकज आढाव श्रीरामपूर, जयश्री गीते बुलढाणा, ज्ञानेश्वर डगळे अहिल्यानगर,सप्तेश चौधरी मनमाड,अमोल देवडे छ्त्रपती संभाजी नगर, सुनिता वानखेडे मनमाड,सौरभ पाटील सांगली,सागर बोडके नाशिक,कल्याण घोलप बीड,लक्ष्मण वाघे सोलापूर,विजय पाटील जळगाव, तुकाराम भगत शेवगाव आदी बारा दिव्यांगांना ऊर्जा पुरस्कार प्रधान करण्यात आले.या उल्लेखनिय कामगिरीबद्दल
आमदार डॉ.किरण लहामटे,माजी आमदार वैभवराव पिचड, युवा नेते अमित भांगरे,आयपी एस अधिकारी डॉ.प्रशांत डगळे,गटशिक्षणअधिकारी अभयकुमार वाव्हळ,विस्तार अधिकारी सविता कचरे,केंद्र प्रमुख बाळासाहेब जाधव,मुख्याध्यापक विकास कडाळी,सुरेश उंडे,सुभाष उंबरे,देवराम डगळे,भिमाजी डगळे, सुरेश डगळे,अनिल बगळे,भरत डगळे,चिंचवणे सरपंच अलका डगळे,उपसरपंच मंदा डगळे, कोहंडी सरपंच-हिराबाई तातळे,पोलीस पाटीलमधूकर देठे,तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक,सर्व मित्रपरिवार आदींनी अभिनंदन केले.