अमृतवाहिनी डी फार्मसी मध्ये राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न

अमृतवाहिनी फार्मसी मधून विद्यार्थ्यांच्या संशोधनास प्रोत्साहन– मा. आमदर.डॉ.सुधीर तांबे
संगमनेर /प्रतिनिधी
-माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्ती प्रोत्साहन दिले जात असून डी फार्मसी मधील राज्यस्तरीय झालेले पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमधून विद्यार्थ्यांना हे मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे संस्थेचे विश्वस्त मा. आ.डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले आहे
अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात राज्यस्तरीय पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते झाले यावेळी समवेत तंत्रसंचालनालय छत्रपती संभाजी नगरचे उपसंचालक डी.आर दंडगव्हाळ ,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही.बी धुमाळ, अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे बी गुरव ,प्राचार्य डॉ मनोज शिरभाते, नाशिकचे प्रा. अविनाश भुतडा ,डॉ. उज्वला कांडेकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये पहिल्या नगर पुणे संभाजीनगर धुळे जळगाव यांसह विविध जिल्ह्यांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत अमृतवाहिनी फार्मसी च्या मुंब्रा तांबोळी व मयुरी साबळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला त्यांना 5000 रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. तर द्वितीय क्रमांक बेल्हे येथील वैष्णवी मोरे व स्वरांजली झिंजर यांनी मिळवला त्यांना 3000 रुपये व प्रशस्ती पत्र आणि मांडवगण येथील शितल मस्के व कुसुम चौधरी यांनी तृतीय क्रमांक मिळवला त्यांना 2000 रुपयांसह सन्मानचिन्ह देण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या या संस्थेचा आज वटवृक्ष झाला असून माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी संस्थेने गुणवत्तेतून देश पातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. अमृतवाहिनीच्या प्रत्येक महाविद्यालयातून संशोधन होतीस वाव दिला जात आहे त्यामुळे विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना थेट नोकरीसाठी प्राधान्य मिळत आहे.
तर डॉ. दंडगव्हाळ म्हणाले की ग्रामीण भागात असूनही अमृतवाहिनी संस्थेने आपला राज्यात वेगळा ठसा उमटवला आहे. पोस्टर प्रेसेंटेशन मधून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला मोठा वाव मिळत असून त्यातून संशोधनास चालना मिळते.
यावेळी प्राचार्य डॉ.मनोज शिरभाते यांनी अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या संस्थेला सर्वोत्कृष्ट पदविका औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय असा तंत्रशिक्षण मंडळातून दर्जा मिळाला असल्याचे सांगून संस्थेमध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या स्पर्धेत राज्यभरातील 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला
या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,संस्थेच्या विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,प्राचार्य डॉ मनोज शिरभाते यांनी अभिनंदन केले आहे.