वीज कंत्राटी कामगारांसाठी,बँक ऑफ इंडियाचे वेतन खाते व अपघात वीमा योजनाचे उदघाटन

पुणे प्रतिनिधी
महावितरण,महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांसाठी,बँक ऑफ इंडियाचे वेतन खाते व अपघात वीमा योजना चे उदघाटन नुकतेच संपन्न झाले
पुणे येथे महावितरणचे मुख्य अभियंता मा.राजेंद्र पवार व उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी .भुपेंद्रजी वाघमारे व बँक ऑफ इंडियाचे डेप्पुटी झोनल मॅनेजर श्रीमती पुष्पालता पट्टेम व प्रमुख अधिकारी यांच्या हस्ते महावितरण रास्ता पेठ कार्यालय येथे शुभारंभ झाला .
या उदघाटन सोहळ्यास महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ प्रदेश अध्यक्ष निलेश खरात , सरचिटणीस सचिन मेंगाळे, संघटनमंत्री उमेश आनेराव,उपमहामंत्री राहुल बोडके,पुणे झोन अध्यक्ष सुमित कांबळे,पुणे झोन सचिव निखिल टेकवडे व भारतीय मजदूर संघाचे अभय वर्तक उपस्थित होते .
वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे विविध महत्वपूर्ण प्रश्न वेतन वाढ, किमान वेतन वाढ , रोजगारात सुरक्षा ई संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांने सातत्याने पाठपुरावा करून सोडविले आहेत .

महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी सहकारी पतसंस्था, इत्यादी मध्ये वेतन जमा केले जायचे या मधुन कंत्राटदार विविध मार्गांनी कामगारांच्या वेतनामधुन दरमहा हजारो रूपये बेकायदेशीर पणे काढून घेतले जायचे, त्यामुळे कंत्राटी कामगारांचे वेतन हे राष्ट्रीयकृत बँकेत जमा केले पाहिजे अशी आग्रही मागणी संघटनेने मा उर्जा मंत्री व तिन्ही कंपनीच्या प्रशासन स्तरावर केली होती.
त्यामुळे दि 12 नोव्हेंबर 2024 रोजी मा मुख्य सचिव उर्जा आभा शुल्का यांनी संघटनेची मागणी मान्य केली तिन्ही कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने बॅंक ऑफ इंडिया च्या प्रशासना सोबत चर्चा करून कामगारां करिता विविध योजना लागु करून घेतल्या आहेत, वीज कंत्राटी कामगारांचे राष्ट्रीयकृत बँकेत सॅलरी खाते असावे व जर कुठलाही वीज कंत्राटी कामगार कुठल्याही अपघातात मृत्युमुखी पडला तर त्याच्या वारसांना बँक ऑफ इंडिया सॅलरी खात्या मार्फत कमीत कमी 22 ते 25 लाखापर्यंत अपघाती विमा मिळावा जेणेकरून त्याच्या वारसांचे पुढील जीवन करिता थोडेफार सहयोग होईल तसेच अपघातादरम्यान अपंगत्व आल्यास त्या पटी मध्ये अपघातग्रस्त वीज कंत्राटी कामगारास लाभ होवु शकतो.
वीज कंत्राटी कामगारांनी बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत सॅलरी अकाउंट ओपन केल्यास कंत्राटदारास बेकायदेशीरपणे रक्कम काढून घेता येणार नाही आणि होणाऱ्या भ्रष्टाचारास आळा बसेल असे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी नमूद केले आहे.
तरी सर्व कंत्राटी कामगारांनी बँक ऑफ इंडियाचे अधिकारी आपल्या जिल्ह्यात तालुक्यात येऊन आपले सॅलरी खाते ओपन करणार आहेत त्यामुळे कंत्राटी कामगारांनी बँक ऑफ इंडियात आपले सॅलरी खाते ओपन करून लाभ घ्यावा असे आवाहन सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे .