इतर

अकोल्यात अभिनव मध्ये मिशन कॉलिटी इम्प्रूमेंट कार्यशाळा!

विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्षमता विकसित

करण्यासाठी प्रयत्न गरजेचे . डॉ. जयश्री देशमुख

 अकोले प्रतिनिधी

जागतिक स्तरावर अभिनवाच्या विदयार्थ्यांना ज्ञानाच्या बाबतीत सुपर बनविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्षमता ओळखून त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन अभिनव शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. जयश्री देशमुख यांनी केले.

 अभिनव शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ जयश्री देशमुख यांनी अभिनव शिक्षण संस्थेतील मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड, वसुंधरा अकॅडमी सीबीएससी बोर्ड ,मारुतीराकोते ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स स्टेट बोर्ड, वसुंधरा अकॅडमी जुनिअर कॉलेज सीबीएससी बोर्ड ,मुळा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल कोतुळ, सह्याद्री व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल राजुर, अभिनव कॉलेज ऑफ सायन्स आय एम बीए, वस्तीगृह विभाग या सर्वांसाठी मिशन कॉलिटी इम्प्रूमेंट कार्यशाळा घेतली याचे दुसरे सत्र संपन्न झाले.

    यावेळी डॉ जयश्री देशमुख पुढे म्हणाल्या की, शिक्षक आणि पालकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास आणि अभ्यासक्रम पूरक  दोन्ही क्षेत्रांमध्ये चालना देणे गरजेचे आहे त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या महत्त्वाच्या गोष्टी इयत्ता तिसरीपर्यंत सर्वोच्च प्राधान्याने यायला हवे असे असे सांगितले घोकंपपट्टी किंवा परीक्षेसाठी शिकण्याऐवजी संकल्पना समजून घेण्यावर शिक्षकांनी भर दिला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला तर्कशुद्ध निर्णय घेण्यासाठी आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी कल्पकता आणि तार्किक विचार करण्याची क्षमता रुजवण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला सक्षम बनवणे गरजेचे आहे. मिशन कॉलिटी इम्प्रूमेंट या कार्यशाळेचा दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षकांनी पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी संज्ञात्मक सामाजिक भावनिक आणि सर्जनशील कौशल्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करावे प्रत्येक विद्यार्थ्याच्या कौशल्याची नोंद ठेवावी इयत्ता तीन ते पाच मध्ये प्रकल्पाधारित आणि अनुभवात्मक शिक्षणावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थी गंभीर विचार समस्या सोडवणे आणि संवाद कौशल्य विकसित करण्यावर भर देतील याकडे लक्ष केंद्रित करावे इयत्ता सहा ते आठ साठी विषय आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करून संकल्पनात्मक समज आणि विश्लेषणात्मक कौशल्य विकसित करणे गरजेचे असेल इयत्ता 9 ते 12 साठी व्यावसायिक आणि शैक्षणिक दोन्ही कौशल्य विकसित करण्यावर भर असेल याचे प्लानिंग  आणि चाचण्या याचे स्वरूप सर्व विभागांच्या शिक्षकांना समजावून सांगितले मिशन कॉलिटी इम्प्रूमेंट  विद्यार्थी केंद्रित असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा याबाबत चर्चा वेळोवेळी संस्था प्राचार्य शिक्षक पालक यामध्ये होईल असे सांगितले.

यावेळी एकविसाव्या शतकातील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अन्वये शैक्षणिक नियमांमध्ये अमुलाग्र बदल नमूद करण्यात आले आहेत या शतकातील शाश्वत विकास ध्येय प्राप्त करण्यासाठी सर्वांना निरंतर अध्ययनाच्या शिक्षणाच्या संधींना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे मत अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले यांनी व्यक्त केले.यावेळी संस्थेचे सर्व विभागाचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button