अत्याचारित अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या!

नाशिक प्रतिनिधी /डॉ शाम जाधव
अत्याचारित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे याबाबत मुलीच्या वडिलांनी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींविरोधात फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे
याबाबत मुलीचे वडील मुकुंदा बुधा भस्मे (वय 38 वर्ष धंदा मजुरी) रा. धारगाव (खडाडवाडी) ता. ईगतपुरी जि. नाशिक यांनी घोटी पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली असून यात म्हटले आहे की
मी वरील ठिकाणी पत्नी गंगुबाई मुकुंदा भस्मे, मुलगा मुन्ना मुकुंदा भस्मे, मुलगी आरती, कविता (मयत) अश्यांसह राहतो मी मोलमजुरी करून माझे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. माझी मुलगी कविता हिचे ईयत्ता 9 वी पर्यंत शिक्षण झालेले होते व त्यानंतर ती घरीच
होती. सनीबाई निवृत्ती बांगारे रा वावीहर्ष ता. त्र्यंबकेश्वर ही नात्याने माझी मेव्हनी आहे. तिचा मुलगा किरण निवृत्ती बांगारे रा. वावीहर्ष ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक हा माझे मेव्हणीचा मुलगा असुन ते वावीहर्ष येथे राहण्यासाठी आहे. माझी मुलगी
कविता हीचे सनीबाई हिचे घरी मावशी असल्याने नेहमी येणे जाणे असायचे.
दिनांक 28.12.2024 रोजी सकाळी माझी मुलगी कविता ही वावीहर्ष येथे माझी मेव्हणी सनीबाई निवृत्ती बांगारे
हिचेकडे गेलेली होती. दिवसभर मुलगी ही वावीहर्ष येथे मेव्हणीचे घरी थांबुन त्यानंतर रात्री 08.30 वाजेचे सुमारास माझी
मुलगी कविता हीस माझे मेव्हणीचा मुलगा किरण निवृत्ती बांगारे हा मोटार सायकलवर सोडण्यासाठी आला होता. त्याने
मुलगी कविता हीस घरापासुन दुर टेकडीवर मोटार सायकलवरुन सोडुन तो तेथुन तसाच परत वावीहर्ष येथे निघुन गेला.
मुलगी कविता ही घरी आली तेव्हा ती घाबरलेली होती व ति रडु लागली म्हणुन मी, माझी पत्नी व मुलगा अश्यांनी कविता
हीस काय झाले बाबत विचारपुस केली असता कविता हिने सांगितले की, मी वावीहर्ष येथुन मावसभाऊ किरण याचे मोटार
सायकलवर बसुन येत असतांना किरण याने एक हात मोटार सायकल चालविण्यासाठी व दुस-या हाताने माझे मांडीवर
पोटावर व अंगावर हात फिरवुन अश्लील चाळे करीत होता तसेच आपण रस्त्यात मोटार सायकल थांबवु का असे बोलत
होता त्यावर मी घाबरुन नाही बोलले तर त्याने तु झालेल्या प्रकाराबाबत घरी काहीएक सांगु नको मला वाडीत तोंड
दाखवायला जागा राहणार नाही असे बोलला बाबत कविता हिने आम्हाला सांगितले. तेव्हा माझा मुलगा मुन्ना याने लागलीच
किरण यास फोन करुन झालेल्या प्रकाराबाबत विचारले असता त्याने आम्हाला कविता ही माझी बहिण असुन मी असे
काहीएक केले नाही असे उडवाउडवीची उत्तरे दिली.
दिनांक 30.12.2024 रोजी सायंकाळी आमचे घरी माझी मेव्हणी सनीबाई निवृत्ती बांगारे, तिचा मुलगा किरण
निवृत्ती बांगारे असे आमचे घरी आले त्यावेळी त्यांनी माझा मुलगा मुन्ना यास तु आम्हाला काय शिवीगाळ करतो असे बोलून
आम्हा सर्वांना वाईट साईट शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती.
दिनांक 01.01.2025 रोजी माझे मेव्हणीची मुलगी सविता नामदेव पारधी रा. लंगडेवाडी, ता. ईगतपुरी हिचा माझे
मुलगा मुन्ना याचे मोबाईलवर फोन आला व तिने कविता हिचेकडे फोन दे असे बोलली मुलाने कविता हिचेकडे फोन
दिल्यानंतर तिने काहीवेळ कविता हिचेशी फोनवर बोलली तिचा फोन कट केल्यानंतर कविता घरात जावुन एकटीच रडत
होती आम्ही तिला काय झाले विचारले असता तिने काहीएक सांगितले नाही.
दिनांक 02.01.2025 रोजी दुपारी 03.00 वाजेचे सुमारास कविता ही घरात कोणास काहीएक न सांगता घरातुन
निघुन गेली होती. नंतर सायंकाळी 04.00 वाजेचे सुमारास आम्हाला गावातील येणा-या महिलांकडुन समजले की, आमचे
खडाडवाडी जवळील पाण्याचे कॅनॉलजवळ असलेल्या करंजीचे झाडाला कविता हिने ओढणीच्या सहाय्याने गळफास
घेतलेला आहे बाबत समजल्याने आम्ही लागलीच सदर ठिकाणी जावुन पाहिले असता सदर ठिकणी मुलगी कविता हिने
ओढणीच्या सहाय्याने कॅनॉल लगत असलेल्या करंजीचे झाडाला गळफास घेतलेला दिसुन आला. नंतर सदर बाबत पोलीस
पाटील यांनी घोटी पोलीस स्टेशनला कळविलेवरुन सदर ठिकाणी पोलीस आले त्यांनी मुलगी कविता हिचे प्रेत ग्रामिण
रुग्णालय घोटी येथे घेवुन जावुन पंचनामा करुन तिचे प्रेतावर पोस्टमार्टेम झालेनंतर आजरोजी प्रेत अंत्यविधीसाठी ताब्यात
दिलेले आहे.
तरी दिनांक 28.12.2024 रोजी पासुन ते दिनांक 02.01.2025 रोजी पावेतो माझे मेव्हणीचा मुलगा किरण निवृत्ती
बांगारे याने माझी मुलगी कविता हिची गाडीवर येतांना छेड काढुन सदर प्रकाराबाबत आम्ही तक्रार करु नये याकरीता
वेळोवेळी माझी मेव्हणी सनीबाई निवृत्ती बांगारे रा. वावीहर्ष तसेच मेव्हणीची मुलगी सविता नामदेव पारधी रा. लंगडेवाडी,
ता. ईगतपुरी अश्यांनी आम्हाला तसेच मुलगी कविता हीस वाईट साईट शिवीगाळ करुन तिस जिवे मारण्याची धमकी देवून
तिला दिनांक 02.01.2025 रोजी कॅनाल लगत असलेल्या करंजीचे झाडाला गळफास घेवुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त
केलेले आहे. म्हणुन माझी वरील 1) किरण निवृत्ती बांगारे, 2) सनीबाई निवृत्ती बांगारे दोन्ही रा. वावीहर्ष ता. त्र्यंबकेश्वर,
3) सविता नामदेव पारधी रा. लंगडेवाडी, ता. ईगतपुरी अश्यांचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद देऊन कारवाई ची मागणी केली आहे