तिखोल चे सखाराम मंचरे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
रविवार दिनांक ५ जुन रोजी अहमदनगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था व यशवंत सेना अहमदनगर यांच्यावतीने दरवर्षी अविरत सेवेचे व्रत अंगीकारून सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या निस्पृह सेवेच्या सन्मानार्थ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दर वर्षी समाजभूषण पुरस्कार देण्यात येतो. या वर्षीचा हा पुरस्कार पारनेर तालुक्यातील तिखोल चे माजी ग्रामपंचायत सदस्य सखाराम मंचरे यांना देऊन गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे यशवंत सेना सरसेनापती माधव (भाऊ) गडदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले .या कार्यक्रमाला शिवसेना मुंबई उपाध्यक्ष नंदकिशोर जाधव, अध्यक्ष विजय तमनर, कांतीलाल जाडकर, जय मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष पोपटराव महानोर व पुरस्कर्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराला उत्तर देताना सखाराम मंचरे म्हणाले पारनेर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात काम करत असताना जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या मार्गदर्शनाने माझे काम असेच सुरू राहिल .
धोत्रे विकास सेवा सोसायटी संस्थेचे संचालक भांड सर हेही या कार्यक्रमास उपस्थित होते .तालुक्याचे माजी आमदार विजयराव औटी, बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर, शारदाताई पांढरे, सविता पाटील तसेच तिखोल ग्रामस्थांच्या वतीने पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.