अवैध दारू विक्री थांबत नसल्याने पोलीस अधीक्षकांनी अकोले व राजूर येथे भेट द्यावी

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील अवैध दारू विक्री थांबत नसल्याने पोलीस अधीक्षकांनी अकोले व राजूर येथे भेट द्यावी अशी मागणी दारूबंदी चळवळी चे कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे कडे केली आहे
अहमदनगर जिल्ह्याचे अधिक्षक म्हणून आल्यावर अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत पहिल्याच बैठकीत आदेश दिले याचे दारूबंदी आंदोलन म्हणून आम्ही स्वागत करतो.
परंतु, नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आम्ही अवैध दारू बंद व्हावी म्हणून आम्ही १५ ऑगस्ट ला आंदोलन केले पण अजूनही दारू थांबत नाही. ज्या शाहूनगर मध्ये २३ मृत्यू आजपर्यंत झाले त्याठिकाणी आंदोलन करूनही आज पुन्हा दोन महिलांनी दारु विक्री सुरू केली आहे. राजूर या गावात दारूबंदी असूनही खुलेआम दारू विकली जात आहे.
यासंदर्भात ३० सप्टेंबर रोजी अकोले येथे पोलीस स्टेशनला बैठक होऊन सुद्धा काहीही फरक झालेला नाही. आपले संगमनेर येथील dysp मदने यांना मी ४ वेळा फोन व अनेक मेसेज करूनसुद्धा त्यांनी काहीही केले नाही हे खेदाने नमूद करतो. वास्तविक १५ ऑगस्ट च्या आंदोलनात त्यांनी दारू बंद करण्याचा शब्द दिला पण आज त्यांचे मुख्यालय असलेल्या संगमनेर येथूनच दारू येते आहे.. तेव्हा आपण लवकरात लवकर राजूर व शाहूनगर येथे भेट देऊन तिथली वस्तुस्थिती बघावी ही विनंती.
१) शाहूनगर येथे पुन्हा दारूविक्री सुरू झाल्याने तेथील विक्रेते तातडीने तडीपार करावे व तेथे दारू देणाऱ्या दुकानांवर कारवाई करावी
२) राजूर येथे पूर्णवेळ पोलीस निरीक्षक नियुक्त करून दारूविक्रेत्यावर झालेल्या केसेस एकत्र करून तडीपार प्रस्ताव करावेत
३) राजूरचे अनेक पोलीस दारूविक्रेत्याना सामील असल्याने *ज्यांच्या बिट मध्ये दारूविक्री होते त्यांना निलंबित करावे कारण पोलिसांच्या वागण्यानेच तेथील दारू वाढली आहे*
४) इंदोरी फाट्यावरील हॉटेल सह्याद्रीमधून दारूविक्री होत असल्याने *हे हॉटेल कायमस्वरूपी सील करण्याबाबत आपण इतर विभागांना पत्र द्यावे.हे हॉटेल बंद होणे खूप गरजेचे आहे आम्ही सतत तक्रारी करून कंटाळलो आहोत. आपण संगमनेर dysp, अकोले राजूर पोलीस स्टेशन यांना वरील मागण्यांबाबत योग्य ते आदेश द्यावेत. अन्यथा पुढील आठवड्यात आम्ही राजूर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करणार आहोत असल्याचा इशाराअकोले तालुका दारूबंदी आंदोलनाचे वतीने देण्यात आला आहे