इतर

राजूर येथे दुसरे राज्यस्तरीय प्रगतिशील आदिवासी साहित्य संमेलन संपन्न

साहित्यिकांनी आदिवासींची संस्कृती आणि क्रांतिकारकांचा इतिहास प्रखरपणे मांडला पाहिजे – संजय दोबाडे

विलास तुपे

राजूर/ प्रतिनिधी

आदिवासी क्रांतिकारकांचा  इतिहास  प्रागतिक अंगाने लिहिणे महत्त्वाचे असल्याचे विचार कथाकार  संजय दोबाडे यांनी व्यक्त केले प्रगतिशील लेखक संघ अकोले तालुका द्वारा आयोजित दुसरे राज्यस्तरीय प्रगतिशील आदिवासी साहित्य संमेलन राजूर येथे ऍड. देशमुख  महाविद्यालय येथे कॉम्रेड बी के देशमुख साहित्य नगरीत आणि दिवंगत कवी संतोष मुठे विचार मंचावर  झाले त्यावेळी त्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. 

     संमेलनाचे उद्घाटन प्रा. डॉ. मिलिंद कसबे यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले. अनिष्ट रूढी परंपरा यांची पोस्टर यांची होळी करून या प्रगतिशील साहित्य संमेलनाचे उद्घाटन अभिनव पद्धतीने करण्यात आले. प्रगतिशील लेखक संघाच्या 90 वर्षाच्या पुरती निमित्ताने विशेष संमेलनाचे आयोजन येथे करण्यात आले होते 

यावेळी आपल्या  अध्यक्षीय  मनोगतातून कथाकार संजय दोबाडे यांनी अत्यंत मुलगामी प्रश्न येथे उपस्थित केले. ज्यावेळेस आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे फासावर चढले त्यावेळेस इतर क्रांतिकारक मात्र बाल वयात असूनही आद्य क्रांतिकारक मात्र राघोजी भांगरे यांना न करता इतरांना केले जाते याबाबत त्यांनी खंत व्यक्त केले. आज आदिवासी साहित्याचे परिस्थिती त्याची दिशा त्याच्या स्वरूप त्याची व्याप्ती यांचा आढावा त्यांनी आपल्या मनोगतातून मांडला. स्वातंत्र्यलढ्यातून आदिवासींची ओळख असण्याचा प्रयत्न तो झाला आदिवासी लेखकांनी आपल्या साहित्यातून प्रखरपणे मांडला पाहिजे याचबरोबर शिवाजी महाराजांच्या एकूण त्या सामाजिक आदिवासींचे असलेले अनन्य साधारण महत्त्व अद्याप मराठी साहित्याने आधोरेखित केलेले नाही हे करण्याची जबाबदारी नवलेखकांनी घ्यावी अशा पद्धतीचे विचार त्यांनी आपल्या निवेदनातून केले. 

      मशाल मोर्चाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी ग्रंथ दालनाचे उद्घाटन सी पी आय चे राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे यांनी केले तसेच कॉ. बी के देशमुख साहित्य नगरीचे उद्घाटन महिला फेडरेशनचे अध्यक्ष स्मिता पानसरे यांनी केले यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून राज्याचे आयकर आयुक्त मुरलीधर बांडे उपस्थित होते.  ज्यामध्ये अकोले तालुक्याचे भूमिपुत्र असणारे जेष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या नव्या विचार वाटा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच कवी सुनील भोसले यांच्या वादळी किनार या काव्यसंग्रहाचे सुद्धा यावेळी प्रकाशन झाले. 

       उद्घाटनाच्या मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक डॉ.मिलिंद कसबे यांनी सध्या कालीन राजकारण धर्म संस्कृती आणि प्रथा परंपरा यांचा आढावा घेताना वैदिक संस्कृती आणि बहुजन संस्कृती याच्यातील फरक औषध करून कोणती मूल्य प्राकृतिक आणि प्रगतिशील आहेत हे स्पष्ट करून सांगितले. उद्घाटन क्षेत्रासाठी महाराष्ट्राचे लोककवी प्रशांत मोरे यांची उपस्थिती होती त्यांनी सादर केलेल्या कवितांना श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.

       यावेळी प्रगतिशील लेखक संघाच्या अकोल्या युनिट चे पदाधिकाऱ्यांची निवड सुद्धा या संमेलनामध्ये पार पडली.

     दुपारी दुसऱ्या सत्रामध्ये आदिवासी संस्कृतीचे मारेकरी कोण हा अत्यंत कळीचा आणि महत्त्वाचा असा परिसंवाद नगर येथील प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ .बापू चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. 

      सहभागी वक्त्यांमध्ये नितीन तळपाडे यांनी आदिवासींचे जीवन विदारक असल्याचे तसेच जल जंगल संपत्तीचे प्रश्न बिकट असल्याची वस्तुस्थिती या ठिकाणी मांडली आम्हाला भाषा पोशाख बोली यांची आदिवासींना लाज वाटते असे सांगून त्यांनी वारू सोनवणे यांची कविता उद्भूत केली. प्रमोद अहिरे यांनी परिसंवाद सहभाग घेताना मारक आणि मारेकरी या शब्दांमधला फरक विषद केला चोरी गुन्हे भीक मागणे आत्महत्या हुंडा पद्धत यामध्ये आदिवासी दिसत नाही असे निरीक्षण नोंदवले पाठ्यपुस्तकांमधून आदिवासी संस्कृती आणि त्यावरील पाठ्यपुस्तकातील मजकूर हेतूतः गायब केला जात असल्याबाबतचे उदाहरणे स्पष्ट केली यावेळी आदिवासी दिनाला आदिवासी असणाऱ्या राष्ट्रपती शुभेच्छा देऊ शकत नाहीत काय त्यांची नेमकी मजबुरी असेल असाही प्रश्न उपस्थित केला नगर जिल्ह्यामध्ये आदिवासी मजुरांचा भरणारा बाजार यावर कधी साहित्य निर्मिती होणार असाही मार्मिक सवाल उपस्थित केला. हनुमंत उबाळे यांनी मजुरांच्या प्रश्नाबाबत आणि वनसंपत्तीचा प्रश्न आणि त्यावरील उपाय याबाबत विवेचन केले त्याचबरोबर सांधणचे राज्याचे अध्यक्ष सोमनाथ कातकाडे यांनी संस्कृती या शब्दाचा व्यापक अर्थ असल्याचे प्रतिपादन केले आदिवासींना संस्कृती समजली आहे का ज्यांना समजली त्यांनी ती जपली का टिकवली का असा प्रश्न उपस्थित केला इतर संस्कृतींमध्ये असणारे एंटरटेनमेंट किंवा मनोरंजनाची कमतरता या साहित्यामध्ये असल्याने व्यापक अर्थाने सवंग लोक या संस्कृतीकडे उथळपणे पाहतात असे विधान केले आणि परक्या होणाऱ्या आक्रमणाला आदिवासींचे जागृत नसणे हेच कारणीभूत आहे असे त्यांनी मांडले यावेळी झालेल्या परिसंवादामध्ये कादंबरीकार तुकाराम चौधरी यांनी मानवी उत्क्रांतीचे सर्व टप्पे विशद करत विविध धर्मांमध्ये माणूस कसा जन्माला आला याच्या ज्या वेगवेगळ्या कल्पना सांगितल्या आहेत त्या सर्व कशा अंधश्रद्धांवर आधारित आहेत हे विवेचन केले आणि संस्कृतीच्या अंगाने आणि इतिहासाच्या अंगाने नव्याने मांडणी होण्याची गरज प्रतिपादन केले. राजू ठोकळ यांनी आदिवासी संस्कृती संपलेली नाही असे विधान केले तसेच नव्याने मांडणी होण्याचे गरज असल्याचे प्रतिपादन केले संस्कृतीमध्ये जे वेळोवेळी बदल होतात ते मान्य केले पाहिजे आज लेह लडाखमधील प्रश्न असो किंवा मणिपूरचा प्रश्न असो किंवा सहाव्या अनुसूची बाबतचा प्रश्न असो किंवा हेमाड संस्कृती जी मूळ आदिवासींची संस्कृती आहे परंतु तिला वैदिकांना सोपवण्याबाबतचे जो प्रयत्न इतिहासात झाला आहे त्याबाबतचे विवेचन केले. 

      आपल्या अध्यक्षीय समारोप मध्ये डॉ. बापू चंदनशिवे यांनी अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे मांडली. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये सर्व आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये छोटी छोटी देवळे मंदिरे पारायण कीर्तने ही जे सुरू झाली आहेत ती खऱ्या अर्थाने आदिवासी संस्कृती वरील आक्रमण आहेत. आदिवासी प्राध्यापक हा सत्यनारायण तसेच आदिवासी प्राध्यापिका रात्रीला नऊ साड्या नेसण्याचे जे अंधश्रद्धा जपते त्याबाबत त्यांनी विवेचन केले आज प्रचलित मीडियामध्ये एकही आदिवासी प्रतिनिधित्व नाही त्याचप्रमाणे घोटूळ ही जी आदिवासींची लग्न प्रथा होती अशा प्रथा आदिवासींनी जपल्या पाहिजेत असे सविस्तर प्रतिपादन करत असतानाच आज आदिवासींचे मारेकरी हे आर एस सारख्या संघटना आहेत आणि तेच आदिवासी संस्कृती पुढील सवर्गात मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. 

      समारोप सतरा मध्ये कवी प्रशांत मोरे यांनी कुंकवासाठी दुर दुर मैना उडून जाईल सारख्या कविता सादर केल्या त्याचप्रमाणे असा कसा महापूर असे सध्याच्या ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या कवितेने सगळ्यांची दाद देऊन गेले. यावेळी आ.डॉ किरण लहामटे , अमित भांगरे यांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी सावळे यांनी केले तर समन्वय विशाल पोटिंदे यांनी केले यावेळी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यामध्ये देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच केंद्रप्रमुख दिलीप नवाळे मोठ्या संख्येने महिलावर्ग तरुण मित्र मंडळ अबाल वृद्ध कार्यक्रमाला उपस्थित होते.

————=-=

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button