अरुणजींच्या संगीताचे आणि संगीतसंयोजनाचे अनेक संस्कार माझ्यावर झाले आहेत. माझ्या गाण्यांतून ते आपल्याला पदोपदी जाणवतात सुद्धा. या प्रतिभावान संगीतकाराची गाणी आजही तितक्याच लोकप्रियतेने गायली जातात. त्यांच्या नावाचा पुरस्कार लाभावा आणि तोही साक्षात पद्मश्री अनुराधाताई यांच्या हस्ते ही माझ्यासाठी विशेष भाग्याची आणि प्रेरणादाई गोष्ट आहे.
हा सोहळा अनुराधा पौडवाल यांच्या निवास्थानी स्थित दक्षिणेश्वरी काली माता मंदिरात संपन्न झाला. याच वेळी ‘स्वरकुल ट्रस्ट’तर्फे सादर झालेल्या “तिमीरातुनी तेजाकडे” या भारतातील पहिल्या दिव्यांग कलाकारांनी गायलेल्या अल्बम मधील अतुल कसबे आणि विजयालक्ष्मी यादव या दोन दिव्यांग गायकांना देखील अनुराधाजींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले! या अंध गायकांनी गायलेल्या महाराष्ट्रातील नवोदित गीतकरांच्या त्यागराजजींनी स्वरबद्ध केलेल्या रचनांना उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद दिली!
याप्रसंगी त्यागराजजींनी दिव्यांग गायकांच्या हिंदी अलबमची, तसेच अनुराधा पौडवाल यांच्यासोबत ‘भजनगंगा’ या हिंदी कार्यक्रमाची योजना जाहीर केली. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन स्व. अरुण पौडवाल यांचे निस्सीम चाहते आणि जाणकार संगीतदर्दी प्रसिद्ध गायक श्री चंद्रशेखर महामुनी यांनी केले.