रांधे ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामस्थांना शुद्ध पाण्याची सोय

दत्ता ठुबे
पारनेर – रांधे ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंधराव्या वित्त आयोगातून गावातील ग्रामस्थांना शुद्ध आणि थंड पाणी उपलब्द व्हावे या हेतूने आरो प्लांटच लोकार्पण खासदार निलेश लंके यांच्या शुभ हस्ते रांधुबाई देवीच्या होमाच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आल्याची माहिती रांधेचे सरपंच दिलीप आवारी यांनी दिली.
यावेळी उपसरपंच अश्विनी आवारी ग्रामपंचायत सदस्य अन्वर शेख माजी उपसरपंच संतोष काटे पाबळ तंटामुक्ती अध्यक्ष संतोष कापसे निलेश लंके प्रतिष्ठान विद्यार्थी अध्यक्ष शुभम शिरोळे निलेश लंके प्रतिष्ठान युवक उपाध्यक्ष अनिल आवारी अमोल आवारी किरण आवारी गोकुळ आवारी साईनाथ झिंजाड सुरेश सरोदे रामदास भोसले देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बजरंग आवारी सचिव नारायण साबळे उपाध्यक्ष विठ्ठल आवारी भाऊसाहेब आवारी ग्रा प सदस्य राजाराम झिंजाड देवस्थान विश्वस्त किरण शेटे माजी उपसरपंच वरून सोनवणे मेजर राजेश साबळे मेजर अशोक आवारी मेजर विक्रम आवारी मेजर पंकज आवारी पोपट आवारी विलास काटे
आरोग्याची काळजी घेणारी रांधे ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत- खासदार निलेश लंके
आरोग्याच्या दृष्टीने पाणी मानवी जीवनास आवश्यक असल्याकारणाने रांधे ग्रामपंचायत ने घेतला हा निर्णय अतिशय स्तुत्य असून ग्रामपंचायतच्या माध्यमातून समाजहितासाठी घेण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती खासदार निलेश लंके यांनी घेतली व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.