ज्ञाना बरोबर कलेची संगत धरा-डॉ.संजय गोर्डे.

सर्वोदय विदया मंदिरात कला मंडळाचे उद्घाटन संपन्न.
अकोले/प्रतिनिधी –1
पैशाने इतिहास लिहिला जात नाही,तो त्यागाने लिहिला जातो.त्यागाशिवाय संस्कृती नाही.त्यासाठी कला पाहीजे.म्हणूनच शिक्षण घेताना ज्ञानाबरोबर कलेची संगत धरा.असे प्रतिपादन डॉ.संजय गोर्डे यांनी केले.
सत्यनिकेतन संस्थेच्या गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथे कला मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी डॉ. गोर्डे विचारमंचावरून बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विदयालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर,उपप्राचार्य अण्णासाहेब ढगे,कलाविभाग प्रमुख शरद तुपविहिरे,बाळासाहेब घिगे,बिना सावंत यांसह दिपक बुऱ्हाडे,संतोष कोटकर,रमेश शेंडगे,रविंद्र मढवई,संतराम बारवकर,सुरेश शेटे,अमोल तळेकर,विकास जोरवर,सचिन लगड,सुधिर आहेर,अजित गुंजाळ,रविंद्र कवडे,सागर चासकर,स्मिता हासे,मधुमंजिरी पवार, आरति खाडे,मंगळा देशमुख आदींसह विदयार्थी उपस्थित होते.
व्याख्याते डॉ.गोर्डे यांनी पुढे मार्गदर्शन करताना एकूण कला ६५ आहेत.त्यामुळे जिवन कळाले पाहीजे.आवडीचे मिळत नाही,जे मिळाले ते आवडून घेतले पाहीजे.ति एक कला आहे.जगण्यासाठी अन्न लागते,का जगायचे आहे यासाठी कला लागते.शिक्षण मेंदुसाठी आवश्यक आहे तर कला मनासाठी आवश्यक.शाहु,फुले,आंबेडकर,
शिवरायांचा महाराष्ट्र म्हणूनच कस वागायच,कस जगायच,काय शिकायच यावर संस्कृती ठिकते.शिक्षणाने,शरीर,मन बळकट झाले पाहीजे.आहाराकडे लक्ष दया.जे खायचे तेच खा,जे पाहीजे तेच पहा,जे करायचे तेच करा तरच जिवनाचा उद्धार होईल.हे समजुन घेण्यासाठी कला महत्वाची असे विचार त्यांनी व्यक्त केले.

अध्यक्ष प्राचार्य श्री.बनकर यांनी विचार व्यक्त करताना कोटी रूपयाचे शरीर दिले आहे.योग्य वेळी संधीचे सोने करा.परमेश्वराने जिवन जगण्यासाठी कला दिली.त्या कलेचा शोध घ्या.आपल्यातील कला ओळखा.मित्र चांगले ठेवा जे जिवन जगायला शिकवतात.असे मत व्यक्त केले.
उपप्राचार्य श्री.धतुरे यांनी गार डोंगराची हवा,बाईला सोसेना गारवा हे गित गायन करून मार्गदर्शन करताना कला ओळखा. छंद जोपासा ते जिवन जगायला मदत करतील.आत्मविश्वास ठेवा.यातुनच कलाकार जन्माला येतात.असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद तुपविहिरे यांनी केले.सुत्रसंचलन बिना सावंत यांनी केले.तर बाळासाहेब घिगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.