आजचे पंचांग व राशी भविष्य ,दि .११/०१/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २१ शके १९४६
दिनांक :- ११/०१/२०२५,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०९,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- पौष
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- व्दादशी समाप्ति ०८:२२, त्रयोदशी ३०:३४,
नक्षत्र :- रोहिणी समाप्ति १२:२९,
योग :- शुक्ल समाप्ति ११:४८,
करण :- कौलव समाप्ति १९:२६,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- धनु – पू. षा.,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयतिथी वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:४१ ते ११:१४ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:२८ ते ०९:५१ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:०० ते ०३:२३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:२३ ते ०४:४६ पर्यंत,
❀ दिन विशेष:
शनिप्रदोष, अमृत १२:२९ नं., घबाड ०८:२२ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २१ शके १९४६
दिनांक = ११/०१/२०२५
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
तुमचा व्यवहार शालीन राहील. गोष्टी मनाप्रमाणे घडवून आणाल. न आवडणार्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराला खुश कराल. आज तुमचा चांगला प्रभाव पडेल.
वृषभ
अचानक खर्च समोर येऊ शकतात. मानसिक व्यग्रता टाळावी. आपल्या मतावर ठाम राहावे. आज उधारी घेणे टाळावे. आध्यात्मिक बाबतीत प्रगती कराल.
मिथुन
आज चांगला धनलाभ होईल. गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील. केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. भावंडांसोबतच्या नात्यात सुधारणा होईल. जवळचे मित्र भेटतील.
कर्क
कामाच्या ठिकाणी प्रगती कराल. कामाचा उरक वाढवावा. सहकार्याला मदत कराल. घरातील कामासाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न राहील.
सिंह
बिघडलेल्या गोष्टी संतुलित करता येतील. आज मनात करुणा निर्माण होईल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल.
कन्या
आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका. हलका आहार घ्यावा. व्यायामाला कंटाळू नका. काही अनपेक्षित गोष्टी घडून येतील.
तूळ
जोडीदारासमवेत वेळ माझे घालवाल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा कमावता येईल. तुमच्या ओळखीत वाढ होईल. सर्वांशी आपुलकीने वागाल. कौटुंबिक जीवनात समाधान मिळेल.
वृश्चिक
छुपे शत्रू माघार घेतील. कोणाकडूनही फार अपेक्षा ठेऊ नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. आपल्या कामात स्वत:ला गुंतवून घ्याल. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका.
धनू
कौटुंबिक जीवनात सुखद अनुभव येतील. आजचा दिवस खेळीमेळीने घालवाल. मुलांसोबत वेळ मजेत जाईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
मकर
आज अधिक वेळ घरात काढाल. स्वत:ला कामात गुंतवून घ्याल. मनातील निराशा दूर सारावी. वाहन विषयक कामे पार पडतील. मनातील विचार घरातील लोकांसमोर मांडाल.
कुंभ
आज घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रवासात काळजी घ्यावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. लहान भावंडे आपल्याला मदत करतील. चौकसपणे सर्व गोष्टींकडे पहावे.
मीन
कुटुंबातील व्यक्तींबाबत अतिशय दक्ष राहाल. सर्वांची आपुलकीने काळजी घ्याल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. खाण्यापिण्याची हौस भागवाल. मनातील भावना व्यक्त कराल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर