नेवासा भाजपा.च्या सरचिटणीसपदी – लक्ष्मण मोहिटे

भारतीय जनता पार्टीची नेवासा तालुका कार्यकारणी जाहीर
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
नुकतीच नेवासा तालुका भारतीय जनता पक्षाची तालुका कार्यकारिणी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी जाहीर केली असुन भानसहिवरे येथील भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे युवा नेते सर्वसामान्यांच्यामनात घर केलेले कोणत्याही क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करणारे लक्ष्मणराव मोहिटे पाटील यांची तालुका सरचिटणीस या महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
मोहिटे हे जवळपास वीस वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.तसेच त्यांच्यावर पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी मध्ये सुद्धा सदस्य म्हणून संधी मिळाली आहे.त्यांनी आतापर्यंत युवा मोर्चा तालुकाध्यक्ष, किसान मोर्चा जिल्हा सचिव तसेच युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले आहे.जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठाणचे माध्यमातून भानसहिवरे पंचक्रोशीत त्यांचे फार मोठे सामाजिक योगदान आहे.एक लढवय्या कार्यकर्ता अशी त्यांची तालुक्यात ओळख आहे.त्यांच्या निवडीमुळे निच्शितच भानसहिवरे परिसरातील पक्षाची ताकद वाढणार आहे.पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, माऊली पेचे, विश्वास काळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.