पारनेरातून 1लाखाहून अधिक मताधिक्य मिळेल.-आमदार निलेश लंके….

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
स्वतःचा विधानसभेचा मतदार संघ असल्याने व मतदार संघातील जनता माझ्यावर समाधानी असल्याने कमीत कमी एक लाखाहून अधिक मताधिक्य मला मिळेल असा आत्मविश्वास आमदार निलेश लंके यांनी टाकळी ढोकेश्वर येथे संवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सभेत बोलताना केला
अध्यक्षस्थानी टाकळी ढोकेश्वर सरपंच सौ.अरुणा खिलारी होत्या. यावेळी टाकळी ढोकेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतून मंगल कार्यालयात पर्यंत पदयात्रेत असंख्य कार्यकर्त्यांसमवेत आमदार निलेश लंके सहभागी झाले होते.
यावेळी माजी सभापती गंगाराम बेलकर, सोन्याबापू भापकर, ऍड राहुल झावरे, बाजार समितीचे व्हा. चेअरमन बापूसाहेब शिर्के, सोमनाथ आहेर, बाळासाहेब खिलारी, रामभाऊ तराळ, दत्तात्रय निवडूंगे, मोहनराव रोकडे, जयसिंग पाटील झावरे, सौ सुनीता झावरे, प्रकाश गाजरे, प्रकाश राठोड,अशोकराव घुले, भागोजी झावरे, सुभाष ढोकळे, अमोल उगले, अशपाक हवालदार, महेश झावरे व टाकळी ढोकेश्वर गटातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार निलेश म्हणाले की अनेक दिवसातून पारनेर तालुक्याला लोकसभेची संधी मिळाली आहे,त्या संधीच सोन पारनेरचे जनता निश्चित करेल असा मला आत्मविश्वास आहे पारनेरची जनता माझ्या कामावर समाधानी आहे. रात्रंदिवस मी मतदार संघासाठी भरीव काम केले आहे.मोठ्या प्रमाणात विकास निधी पारनेर तालुक्याला मिळवून दिला 350 कोटी रुपये विकास निधी थांबविल्याप्रकरणी आमदार लंके यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.संवाद यात्रेच्या माध्यमातून सर्व मतदार संघात फार मोठा प्रतिसाद मला मिळत आहे,ही लढाई तालुक्याची अस्मितेची व प्रतिष्ठेची असल्याने सर्वांनी मतभेद विसरून काम करावे असे आव्हान त्यांनी केले ही निवडणूक प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहे सर्वसामान्य जनता हेच माझे मोठे भांडवल आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक लढवत असून पारनेरचे देशात नाव होण्यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आमदार निलेश लंके म्हणाले.
यावेळी गंगाराम बेलकर,किरण ठुबे,सोमनाथ आहेर,प्रकाश गाजरे,ऍड. राहुल झावरे,बापूसाहेब शिर्के,सौ.सुनीता झावरे,अभिजीत झावरे,अशोकराव घुले यांची भाषणे झाली.बाळासाहेब खिलारी यांनी सूत्रसंचालन केले.